संगमेश्वर (एजाज पटेल) : संगमेश्वरजवळच्या शिवणे-सनगरेवाडी परिसरात मंगळवारी सकाळी घडलेली घटना अंगावर काटा आणणारी आहे. रोजच्या संसारासाठी सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या साक्षी मंगेश पवार यांच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. मात्र, वाघाने चढवलेला हल्ला या ‘वाघिणी’ने परतवून लावत मोठ्या धाडसाने आपली सुटका केली. प्रणिता सनगरे, सुप्रिया सनगरे आणि साक्षी पवार नेहमीप्रमाणे तिघी मिळून जंगलात सरपणासाठी गेल्या होत्या. पण अचानक बिबट्या पुढे आला आणि क्षणात साक्षी पवार यांच्यावर झेपावला. जोरदार पंजा मारताच त्या पायावर गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या.
सुरुवातीला ती घाबरली. वेदनेने हालचाल करणेही कठीण झालेल्या साक्षी पवार यांनी क्षणात स्वत:ला सावरले. हार न मानता बिबट्याला प्रतिकार केला. मृत्यू समोर उभा असताना त्यांनी जोरात बिबट्याला ढकलले. त्याचवेळी प्रणिता आणि सुप्रिया सनगरे यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड सुरू केली. या भीतीदायक आवाजाने चकित झालेला बिबट्या जंगलात पसार झाला आणि साक्षी पवार यांचे प्राण वाचले. साक्षी म्हणाल्या, बिबट्याने अचानक झडप घातली. पळायला जागाच नव्हती. जखमी अवस्थेतही मी त्याला दूर ढकललं आणि माझ्यासोबतच्या दोघींनी मदत केली. नशीब बलवत्तर होतं म्हणून त्याला माझी मान सापडली नाही.
मंगळवारी ११.३० वा.च्या सुमारास घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. साक्षी पवार यांच्यावर तातडीने खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गावकर्यांमध्ये मात्र आजही बिबट्याची दहशत असून रोजच्या जगण्याच्या शोधात निघालेल्या ३ महिलांनी मृत्यूला इतकं जवळून पाहिलं की त्या आठवणींचा थरार बराच काळ विसरता येणं कठीण आहे.















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.