loader
Breaking News
Breaking News
Foto

सौ. वहिदा बशीर मूर्तूझा यांना घड्याळाचे चिन्हासमोरील बटण दाबून रत्नागिरी नगराध्यक्ष पदासाठी विजयी करा : श्री. राजन सुर्वे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदासाठी श्री. बशीरभाई मुर्तूझा यांच्या पत्नी सौ. वहिदा बशीर मुर्तूझा यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. सौ. वहिदा मूर्तूझा यांनी रत्नागिरीच्या नियोजनबध्द विकासासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार केला असून त्या मोठ्या निर्धाराने निवडणुक रिंगणात उतरल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी नगरी ‘सजवण्याचा’ व रत्नागिरीला ‘कॅपिटल सिटी’ बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांनी रत्नागिरीकरांना उत्तम प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक नाविन्यपूर्ण कल्पना मतदारांसमोर मांडल्या आहेत. रत्नागिरीत मुळातच घरपट्टी कर जादा आहे. असे असताना नागरिकांवर वाढीव घरपट्टी कराचा बोजा लागू नये त्याऐवजी नगर पालिकेला अन्य उत्पन्नाचे स्त्रोत सुरु करावेत, तसेच अनावश्यक खर्चाला कात्री लावून काटकसर करावी असे मार्ग त्यांनी सुचविले आहेत.

टाइम्स स्पेशल

सौ. वहिदा मुर्तूझा या सुसंस्कृत व सोज्वळ आहेत तसेच त्या कर्तबगार व कर्तव्यतत्पर आहेत. त्या प्रशासन कुशल व अनुभव संपन्न आहेत, त्या जनहित दक्ष आणि जनतेसाठी तळमळीने कार्य करणार्‍या आहेत. तरी सर्व मतदार बंधु भगिनींनी त्यांच्या घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून सौ. वहिदा मूर्तूझा यांना भक्कम मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहन रत्नागिरीतील ज्येष्ठ समाजनेते श्री. राजन सुर्वे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg