loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामिण भागातील विद्यार्थी बालवैमानिक झाल्यास देशाची प्रगती झपाट्याने होईल - नाम. आदिती तटकरे

म्हसळा - पंचायत समिती शिक्षण विभाग आणि आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळा यांच्या विद्यमाने २०२५-२६ चे ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा येथे आयोजित करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शन उदघाटन प्रसंगी नाम. आदिती तटकरे यांनी बोलताना सांगितले कि, देशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. भारतीय शात्रज्ञ् या क्षेत्रात विविध शोध लावून वैज्ञानिक दृष्टया आमुलाग्र बदल घडवून आणण्यात यशस्वी होत आहेत. तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामिण भागातील बालवैज्ञानिकांना आपल्यातील सुप्त गुण सादर करण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अश्या प्रकारे मिळणाऱ्या संधीचा योग्य तो फायदा उठविल्यास विज्ञानाच्या दृष्टीकोनातून देशाची झपाट्याने प्रगती होण्यास वेळ लागणार नाही असे सांगून नाम. आदिती तटकरे यांनी भविष्यात तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी आणि सर्व शाळांना सोयीस्कर ठरेल अश्या दोन शाळांमध्ये लॅब ची निर्मिती करणार असल्याचे सांगून तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांना स्क्रीन च्या माध्यमातून डिजिटल शिक्षण घेता येईल.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी माजी सभापती तथा सचिव आयडियल इंग्लिश स्कूल, गटविकास अधिकारी माधव जाधव, निवासी नायब तहसीलदार डॉ. मृणाली शिरसाट, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, पोलीस निरीक्षक रविंद्र पारखे, उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे, अनिल बसवत, प्रिन्सिपॉल बारी, माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष नितीन पाटील, अव्वल कारकून सलीम शहा, अंजुमन हायस्कूल प्राचार्य अ. रहमान घराडे, गणित विज्ञान मंडळ अध्यक्ष, सर्व केंद्र प्रमूख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg