loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा नगरपंचायत आणि राजापूर नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल - आमदार किरण सामंत

केळंबे-लांजा (वार्ताहर) - राज्यामध्ये नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या असून यामध्ये लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेची एक हाती सत्ता येणार असून राजापूर नगर परिषदेवर भगवा फडकवणार लांजा नगराध्यक्ष ४००० राजापूर नगराध्यक्ष १२०० मताने निवडून आणणार असल्याचे आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी ते म्हणाले की लांजा नगरपंचायतीच्या सर्वच्या सर्व १७ जागा जिंकत नगराध्यक्षपदी सावली कुरूप ४००० मताधिक्याच्या फरकाने निवडून आणत एक हत्ती सत्ता राखणार यात शंका नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत विरोधकांच्या डोक्यावर परिणाम झाला होता म्हणून अपप्रचार केला जात होता. परंतु या अपप्रचाराला बळी न पडता फक्त आणि फक्त विकासालाच प्राधान्य देत राजापूर शहरातील मतदारांनी शिवसेनेवर विश्वास व्यक्त करीत आम्हालाच मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. म्हणून राजापूर नगर परिषदेमधील १९ नगरसेवक व नगराध्यक्ष किमान १२०० मताच्या फरकाने निवडून येईल यात शंका नाही.

टाइम्स स्पेशल

मी ज्या दिवशी आमदार झालो होतो, त्याच दिवशी ठरविले होते कोणत्याही परिस्थितीत राजापूर नगर परिषदेवर भगवा फडकवायचाच, असा मी निश्चय केला होता. मतदारांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला आहे. लांजा शहरांमध्ये कधी न्हवे तेवढा मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. दुसर्‍या बाजूला विरोधकांचा कुठे प्रभाव दिसला नाही, अशाच वेळी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी यांनी एकत्रित केलेल्या मेहनतीचे फळ आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास २१ डिसेंबर रोजी होणार्‍या मतमोजणीच्या दिवशी दिसणार आहे. आम्ही सर्वच्या सर्व १७ जागा जिंकत नगराध्यक्ष मोठ्या मताधिक्याने जिंकणार आहोत. लांजा आणि राजापूर शहरातील मतदारांनी मतदानामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याबद्दल दोन्ही शहरातील मतदारांचे शतशः आभार आमदार किरण सामंत यांनी मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg