loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे शहरात कोपरीत ‘माझ्या पोलीस स्टेशनला भेट द्या ’ला जोरदार प्रतिसाद

ठाणे (प्रतिनिधी) - कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी “माझ्या पोलीस स्टेशनला भेट द्या” हा राज्यस्तरीय उपक्रम उत्साहात पार पडला. ठाणे पोलीस आयुक्तालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण ठाणे विधिसेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यक्रम घेण्यात आला, ज्यात नागरिकांनी पोलीसांच्या विविध विभागांचे काम, तपास पद्धती, कायदेशीर मदत सेवा याबद्दल प्रत्यक्ष माहिती घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र राज्य कायदेशीर विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिक पोलीस यांच्यातील दरी कमी करणे, विश्वास दृढ करणे आणि कामकाज पारदर्शक करणे हा आहे. उपक्रमादरम्यान नागरिकांना आपल्या हक्कांविषयी, उपलब्ध कायदेशीर मदत सेवांविषयी, तसेच पोलीसांशी संवाद साधताना अनुसरावयाच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनीही परिसरातील सुरक्षाविषयक सूचना व समस्या मांडत मुक्त संवाद साधला.

टाइम्स स्पेशल

“पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचे भक्कम स्तंभ आहे. नागरिकांनी पोलीस ठाण्यांशी भीती न बाळगता संवाद वाढवावा,” असे आयोजकांनी सांगितले. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम ठाण्यात यशस्वी ठरत पोलीस–नागरिक संबंध अधिक मजबूत करण्याकडे एक महत्वाचा टप्पा ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg