loader
Breaking News
Breaking News
Foto

सुरळ येथील श्री वाघजाई देवी, काळकाई देवी मंदिरातील पहिले मानकरी मारुतीराव चव्हाण यांचा भव्य सत्कार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील सुरळ येथील श्री वाघजाई देवी, काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री वाघजाई देवी, काळकाई देवी मंदिर वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमासाठी साजरा करण्यात आला. वर्धापन दिन कार्यक्रमांमध्ये श्री वाघजाई व काळकाई देऊळ कमिटी आणि ग्रामस्थ सुरळ यांच्या वतीने देऊळ समिती अध्यक्ष, पहिले मानकरी असलेले मारुतीराव शिवराम चव्हाण यांचा सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पहिले मानकरी मारुतीराव शिवराम चव्हाण हे गेली ५० हून अधिक वर्षे देवीच्या वार्षिक कार्यक्रमांचे उत्कृष्ठ आणि उत्तम प्रकारे आयोजन करुन ते साजरे करण्यासाठी सर्व मानकरी तसेच ग्रामस्थांना सोबत घेऊन आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मान-सन्मान केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावातील जुन्या देवळांचे, सहाणेचे तसेच नव्या देवळाच्या उभारणीसाठी आणि देव गावात आणण्यासाठी त्यांनी दिलेला अमूल्य वेळ व मार्गदर्शन गावासाठी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.मंदिराच्या त्रैवार्षिक वर्धापन दिनानिमित्त, ७० व्या वर्षी श्री वाघजाई व काळकाई देऊळ कमिटी आणि ग्रामस्थ सुरळ यांचेकडून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे या कार्यक्रमांमध्ये गावातील ज्येष्ठ नमन कलाकार जनार्दन रावणंग यांचाही शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नमन कलाकार जनार्दन रावणंग,देऊल कमिटी अध्यक्ष मनोहर चव्हाण, उपाध्यक्ष रवींद्र पांडुरंग आग्रे, सचिव विजय गोविंद पारदले, विद्याधर बागकर, माजी सरपंच महेश्वर बागकर,खजिनदार सचिन रावणंग, सह खजिनदार संतोष आग्रे, सदस्य जगन्नाथ भोसले, दिलीप आग्रे, विनोद चव्हाण, सतीश ठाकूर नरेश नवरत सुरेश मुर्डेकर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

यावेळी विद्याधर बागकर, माजी सरपंच महेश्वर बागकर यांनी मनोगत व्यक्त केले.वर्धापन दिनानिमित्त मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये कलाविष्कार कलामंच गुहागर निर्मित "कोकणरंग" कार्यक्रम सादर केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरळ येथील श्री वाघजाई देवी, श्री काळकाई देवी मंदिर देऊळ कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ यांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg