loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलतर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलतर्फे आरोग्य तपासणी शिबीर व उपचारविषयक मार्गदर्शन संपन्न झाले. सदरच्या आरोग्य तपासणी शिबीर तपासणी पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. मुजावर, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एस. जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. उपाध्ये उपस्थित होते. यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल यांच्या हस्ते पुष्प व पुस्तकरूपी भेट देवून स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरच्या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तज्ञांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली व त्यांना उपचारविषयक मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीमध्ये उंची, वजन, डोळे, दात आणि सामान्य आरोग्य तपासले. विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या माहितीचा वापर आरोग्य सुधारण्यासाठी, आजारांचे लवकर निदान करण्यासाठी, शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि आरोग्याच्या समस्यांसाठी पुढील उपचारांची दिशा ठरवण्यासाठी होतो. यामुळे विद्यार्थ्यांना निरोगी राहण्यास मदत होते आणि गरजेनुसार वेळेवर उपचार करण्यास मदत होते.

टाइम्स स्पेशल

सदर शिबीरासाठी उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे पूर्वप्राथमिक विभागप्रमुख सौ. प्रितम वडके आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी शिबीरास शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg