loader
Breaking News
Breaking News
Foto

वर्ल्ड पाॅवरलिप्टींग चॅम्पियन्सशिप 2025 मध्ये सुशांत आग्रेची सुवर्ण पदकाची कमाई

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील रावारी गावचा सुपुत्र आणि भारतीय पाॅवरलिप्टींग संघाचा कर्णधार सुशांत सोनू आग्रे याने आपल्या ताकदीच्या जोरावर भारताचा तिरंगा फडकावला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.     सुशांत आग्रे याने आपल्या मेहनतीच्या बळावर श्रीलंकेतील (कोलोंबो) येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड पाॅवरलिप्टींग चॅम्पियन्स शिप 2025 मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. या जागतिक स्पर्धेत 12 हून अधिक स्पर्धेक सहभागी झाले होते. या चॅम्पियन्स शिपमध्ये सुशांत आग्रे याने 69 किलो वजनी गटात तब्बल 222 किलो वजन उचलून भारताच्या नावावर सुवर्णपदक कोरले. त्याच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे रावारी गाव आणि लांजा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.       अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. मुंबईत नोकरी सांभाळून पाॅवरलिप्टींगचा सराव आणि सातत्य राखून जिद्द आणि मेहनतीच्या जीवावर सुशांतला जागतिक स्तरावर सुवर्ण पदक मिळाले आहे. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg