loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग गुन्हेगारांचे 'सेफ हेवन' बनतेय?

दोडामार्ग (प्रतिनिधी) - निसर्गरम्य दोडामार्ग तालुक्यात परप्रांतीयांचा वाढता वावर आता केवळ डोकेदुखी ठरत नसून, तो माता-भगिनींच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहे. काल शहरात काही परप्रांतीय तरुणांकडून एका महिलेबाबत अनुचित प्रकार घडल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. नक्की काय घडले याबाबत स्पष्टता नसली, तरी काही सतर्क नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. या घटनेची अधिकृत वाच्यता झाली नसली तरी, या निमित्ताने शहरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रस्त्यावर टोळक्याने फिरणारे परप्रांतीय तरुण आणि त्यांचा संशयास्पद वावर यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. कालच्या चर्चेतील घटनेमुळे 'दोडामार्गात आपल्या आया-बहिणी सुरक्षित आहेत का?' असा धडकी भरवणारा प्रश्न उपस्थित झाला आहे. जर दिवसाढवळ्या असे संशयास्पद प्रकार घडत असतील, तर शाळेत जाणाऱ्या मुली आणि नोकरदार महिलांनी निर्भयपणे घराबाहेर पडायचे तरी कसे? दोडामार्ग तालुका गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्याने गुन्हेगारांसाठी लपण्याचे सोयीस्कर ठिकाण बनत चालला आहे. शहरात आणि परिसरात वावरणाऱ्या अशा लोकांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली गेलेली नसते. त्यामुळे शेजारच्या राज्यातून पळून आलेले गुन्हेगार इथे आश्रय घेत आहेत का? आणि स्थानिकांच्या जिवाशी खेळत आहेत का? याचा तपास होणे गरजेचे आहे.

टाइम्स स्पेशल

केवळ गुन्हा घडल्यावर आरोपींना पकडणे पुरेसे नाही, तर असे लोक इथे येतातच कसे? आणि विना-व्हेरिफिकेशन राहतात कसे? याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. कालच्या घटनेची दबक्या आवाजात का होईना, पण चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी आतातरी शहरात विनापरवाना राहणाऱ्यांची झाडाझडती घ्यावी आणि संबंधित ठेकेदार व घरमालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg