loader
Breaking News
Breaking News
Foto

वराडकर बेलोसे कनिष्ठ महाविद्यालय, दापोली राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) निवासी शिबिरास कर्दे येथे सुरुवात

दापोली (प्रतिनिधी) : वराडकर बेलोसे कनिष्ठ महाविद्यालय, दापोली यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) निवासी शिबिराचा उद्घाटन सोहळा कर्दे विश्वविपवाडी येथे अत्यंत उत्साहात पार पडला. एनएसएस स्वयंसेवक, ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीने परिसर आनंदमय झाला. कार्यक्रमाची सुरुवात विभीषण ढवळे (कार्यक्रम अधिकारी) यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी एनएसएस चे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील त्याचे योगदान आणि सेवा भावना दृढ करण्यातील भूमिका यावर प्रकाश टाकला. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्दे (दापोली) गावचे सरपंच सचिन तोडणकर उपस्थित होते. कर्दे गाव हे महाराष्ट्र शासनाने पर्यटन क्षेत्रासाठी सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा म्हणून गौरवलेले प्रसिद्ध ठिकाण आहे. आपल्या भाषणात त्यांनी पर्यटन विकास, स्वच्छता आणि युवकांच्या जबाबदारीची जाण यावर भर दिला. एनएसएस शिबिरामुळे समाजकार्याची नवी उर्जा विद्यार्थ्यांना मिळते, असे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे चेअरमन धनंजय राव यादव यांनी विद्यार्थ्यांना अतिशय मार्गदर्शक आणि प्रेरणादायी विचार मांडले. ते म्हणाले की, शिबिरातील शिस्त ही एनएसएस स्वयंसेवकांची ओळख आहे. गावात येताना आपण कसे वागावे, आपले वर्तन कोणत्या मूल्यांवर आधारित असावे, याचे भान प्रत्येक स्वयंसेवकाने ठेवावे. गावाने महाविद्यालयाचा आणि विद्यार्थ्यांचा आदर्श उत्तम असल्याचे कौतुक केले पाहिजे, यासाठी स्वयंसेवकांनी आदर्श आचरण ठेवून काम करावे. त्यांच्या या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना शिस्त, जबाबदारी आणि मूल्याधिष्ठित वर्तनाचे महत्व अधोरेखित झाले. अनंत सणस सहकार्यवाह आर.व्ही.बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशन, श्रीमती मीना कुमार रेडिज, विश्वस्त, आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशन, दापोली विशेष उपस्थिती डॉ. भारत कन्हाड, प्राचार्य, वराडकर बेलोसे महाविद्यालय. प्रा. लक्ष्मीकांत पाटील, पर्यवेक्षक, वराडकर बेलोसे कनिष्ठ महाविद्यालय. दत्ताराम भुवड, उपसरपंच, ग्रामपंचायत कर्दे. दिनेश रुके अध्यक्ष, तंटामुक्त समिती,शाळा व्यवस्थापन समिती, विश्वविपवाडी कर्दे. शिबिरादरम्यान स्वच्छता मोहीम, ग्रामविकास उपक्रम, आरोग्य जनजागृती, वृक्षसंवर्धन, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

टाइम्स स्पेशल

एनएसएस निवासी शिबिर विद्यार्थ्यांमध्ये सेवा वृत्ती, नेतृत्वगुण, शिस्त आणि सामाजिक जाणीव वाढवण्याचे कार्य करते, असे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. उद्घाटन कार्यक्रम २ डिसेंबर २०२५ रोजी, सायंकाळी ४.०० वाजता, ग्रामपंचायत कर्दे(दापोली) विश्वविपवाडी येथे संपन्न झाला. हे श्रम संस्कार शिबिर २ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत खरेदी येथे संपन्न होत आहे. यावर्षी या शिबिराचे स्लोगन स्वच्छ भारत अभियान हे ठेवण्यात आले आहे. या स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून करते गावातील स्वच्छता अभियान वनराई बंधारे त्याचबरोबर समाज जागृती अभियान, आरोग्यविषयक शेती विषयक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्पाधिकारी मानसी कोवळे यांनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शन सहाय्यक प्रकल्पधिकारी युवराज आग्रे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg