मुंबई: राज्यात सुरू असलेल्या २६७ नगर परिषद, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना शिंदे गटात अंतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आली आहे. निवडणुका, गुन्हे, आरोप-प्रत्यारोप आणि युतीतील वाढता अविश्वास या सर्वांच्या भोवऱ्यात शिंदे गटातील अनेक नेते पुन्हा ‘मातोश्री’ची आठवण काढू लागल्याचे संकेत राजकीय वर्तुळांतून मिळत आहेत. त्यामुळे अनेकजण ठाकरे गटात आगामी काळात घरवापसी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील दोन दिवसात ठाकरे गटात शिंदेंच्या महत्त्वाच्या नेत्यांनी घरवापसी केली आहे. त्यामुळे परत येणाऱ्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे खुले झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्याच्या राजकारणात शिंदे गटाची कोंडी, ताणलेली महायुती आणि ‘घरवापसी’च्या हाका, या सर्व घडामोडींनी आगामी महिन्यांतील राजकीय नाट्यमयतेची चाहूल दिली आहे.महाड नगरपालिका निवडणुकीच्या दिवशी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र, विकास गोगावले आणि राष्ट्रवादी नेत्या स्नेहल जगताप यांच्या समर्थकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. विकास गोगावलेंनी प्रतिस्पर्धी कार्यकर्त्याकडे असलेले पिस्तूल काढून पत्रकारांसमोर दाखवल्यानंतर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला. या घटनेनंतर नाराज झालेल्या भरत गोगावले यांनी “आमचे मातोश्रीशी संबंध अजूनही कायम आहेत” असे स्पष्ट विधान करत पक्षांतर्गत नाराजीला उघडपणे वाचा फोडली.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधातही अलीकडेच वेगवेगळे गुन्हे दाखल झाले किंवा छापे पडले. सलग कारवायांमुळे “टार्गेट आम्हालाच केले जात आहे,” असा सूर शिंदे गटात आहे.भाजपकडून ‘शत–प्रतिशत’चा नारा, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आक्रमक नेतृत्व, अजित पवार गटाला मिळणारे प्राधान्य, या सर्वांमुळे शिंदे गटात अस्वस्थता वाढत असल्याचे संकेत समोर येत आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे पक्ष एकमेकांसमोर उभे राहिले. कणकवलीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र लढल्याने नवीन समीकरणांची कुजबुजही सुरू आहे.मागील काही दिवसांत शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची पावले पुन्हा एकदा 'मातोश्री'च्या दिशेने वळत आहेत. मागील दोन दिवसात मातोश्रीवर शिंदेंच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातील उपविभाग प्रमुख आबा मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेन ठाकरे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातील जवळपास १०० कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. तर, नवी मुंबई सहसंपर्क प्रमुख शिरीष पाटील यांनीदेखील समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला.















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.