loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादीतुन शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगराध्यक्ष आणी नगरसेवकांचा शिवसेना तालुका संघटनेकडून सत्कार

म्हसळा (वार्ताहर) - म्हसळा नगरपंचायतच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष सह आठ नगरसेवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादीसह खासदार सुनील तटकरे यांना धक्का दिला होता. त्यानंतर दोन दिवसांनी म्हसळा तालुका शिवसेना तालुकाप्रमुख सह महिला आघाडी, युवासेना तालुका प्रमुख, शहरप्रमुख यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून खासदार सुनील तटकरे यांनी जशास तसे उत्तर दिले होते. प्रवेश केलेल्या नगराध्यक्ष आणी नगरसेवकांचा मंत्री भरत गोगावले यांचा उपस्थितीत जंगी मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यावेळी राष्ट्रवादीकडून काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला होता. प्रवेश केलेल्या नगराध्यक्ष आणी नगरसेवकांची तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांच्याजवळ ओळख व्हावी म्हणून तालुका संघटनेकडून नगरपंचायत मध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुका संपर्क प्रमुख अमोल पेंढारी, उपतालुका प्रमुख बाबू बनकर, पदरथ, दीपेश जाधव, अक्रम साने, अकमल कादरी, अजय करंबे, उदय चाळके, नदीम दळवी, कासीम मेमन आणी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे नगराध्यक्ष फरहीन बशारथ यांनी यावेळी सांगीतले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg