loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री गुरुदेव दत्त मंडळ पाडले आयोजित कबड्डी स्पर्धेत टाळसुरेचा अमरभारत विजेता

दापोली (प्रतिनिधी) - श्री गुरुदेव दत्त मंडळ पाडले यांनी श्रीदत्त जयंती उत्सवानिमित्त पाडले भंडारवाडा येथील सत्कार्य नाटय थिएटर मागील मैदानावर आयोजित केलेल्या मॅटवरील तालूकास्तरिय भव्य कबड्डी स्पर्धेत टाळसुरे च्या अमरभारत कबड्डी संघाने आपल्या प्रतिस्पर्धी सालदुरे श्री सिमामाता  कबड्डी संघावर मात करत अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब करत प्रथम क्रमांक पटकावला तर उप विजेता ठरलेल्या सालदुरे येथील श्री सिमामाता कबड्डी संघाला दुसऱ्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील पाडले येथील श्रीदत्त जयंती उत्सवाचे यावर्षी 108 वे वर्षं आहे. अशा या अखंडीत उत्सवाची परंपरा असलेल्या दत्तजयंती उत्सवानिमित्त श्री गुरुदेव दत्त मंडळ पाडले यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही धार्मिक कार्यक्रमांसह विविध प्रकारचे सामाजिक , सांस्कृतिक आणि क्रिडाविषयक स्पर्धा कार्यक्रमांचे मोठ्या दिमाखात आयोजन केले आहे त्याच क्रिडा प्रकारतील मॅटवरील तालूका स्तरिय भव्य कबड्डी स्पर्धा पाडले येथे घेण्यात आली . यामध्ये तालुक्यातील नावाजलेल्या एकुण १६ कबड्डी संघानी स्पर्धेत आपला सहभाग घेतला होता. दोन दिवस चाललेल्या या कबड्डी स्पर्धेचा दर्जेदार खेळ पाहण्यासाठीची पाडले परिसरातील क्रिडारसिकांना नामी संधी मिळाली या आयोजित कबड्डी स्पर्धेतील अंतिम लढतीचा सामना हा टाळसुरे येथील अमरभारत आणि सालदुरे येथील श्री.सिमामाता कबड्डी संघा दरम्यान झाला यामध्ये टाळसुरे च्या अमरभारत संघाने सालदुरे श्री.सिमामाता कबड्डी संघाचा २१ गुणांनी पराभव केला आणि विजेतेपद पटकावले त्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकाचा मान मिळाला तर उपविजेत्या श्री.सिमामाता सालदुरेला दुसरा क्रमांक जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत दाभोळ येथील चंडिका कबड्डी संघाला तृतीय तर केळशी येथील श्री.गजानन संघर्ष कबड्डी संघाला चतुर्थ क्रमांकाने गौरविण्यात आले. या स्पर्धेत सालदूरे कबड्डी संघाचा आर्य शेवडे उत्कृष्ट खेळाडू तर अमरभारत कबड्डी संघाच्या संजोग लाले याची उत्कृष्ट पक्कड आणि अफाक ऐनरकर ची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

अंतिम विजेत्या टाळसुरे येथील अमरभारत कबड्डी संघाला प्रथम क्रमांकाचे सौ. नेहा अमेय आरोळकर मयेकर आणि प्रियांका विनित राऊत मयेकर यांजकडून रोख रक्कम २१ हजार रुपये आणि विदिशा, दिव्यांशी रिना रविंद्र सातनाक यांनी प्रायोजित केलेल्या आकर्षक चषक देऊन दापोली पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि पाडले ग्राम पंचायतीचे सरपंच तसेच श्री गुरुदेव दत्त मंडळ पाडले चे अध्यक्ष रविंद्र सातनाक तसेच उपसरपंच सेजल मयेकर यांच्या शुभहस्ते हस्ते सन्मानपूर्वक सन्मानित करण्यात आले. या कबड्डी स्पर्धेचे आपल्या ओघवत्या भाषेतील शैलीत उत्कृष्ट असे समालोचन उत्कर्ष अनिल कर्देकर यांनी केले. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत सुध्दा अंतिम सामना पुर्ण होईतोवर कोणीही आपले आसन सोडले नाही त्यामुळे क्रिडारसिकांकडून मिळणाऱ्या उस्फुर्त प्रतिसादाच्या प्रोत्साहनामुळे स्पर्धेची चांगलीच रंगत वाढली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg