loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिरात करंजणी गावात विद्यार्थ्यांचे विक्रमी कार्य

दापोली (वार्ताहर) - एन. के. वराडकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, दापोली यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करंजणी येथे आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार निवासी शिबिरात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सामाजिक कार्य पार पाडले. या शिबिरादरम्यान महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सध्या कोकण कृषी विद्यापीठात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत असलेले श्रीकृष्ण गंगावणे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. राष्ट्र विकासातील युवकांची भूमिका या विषयावर बोलताना त्यांनी विनोदी, मार्मिक आणि प्रभावी कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक, आर्थिक, मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक विकासाचे महत्त्व समजावून सांगितले. युवकांनी सर्वांगीण विकास साधून राष्ट्रनिर्मितीत कसे योगदान द्यावे, याबाबत त्यांनी उत्स्फूर्त मार्गदर्शन केले. तसेच करंजणी गावाशी असलेली स्वतःची आठवण सांगत विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुकही केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी करंजणी आणि परिसरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दोन दिवसांत १९ बंधारे बांधण्याचे विक्रमी कार्य केले. करंजणी गावात १० आणि उघडा मारूती परिसरात ९ असे एकूण १९ बंधारे विद्यार्थ्यांनी गावकर्‍यांच्या सहकार्याने उभारले. या कार्यामुळे परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार असून गावकर्‍यांकडून विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. या कामात गावातील विविध मान्यवरांचा सक्रिय सहभाग होता.

टाइम्स स्पेशल

सरपंच लहू साळवी, माजी सभापती प्रकाश कालेकर, महाळुंगा विकास समितीचे चेअरमन तानाजी कालेकर, उपसरपंच समीक्षा कालेकर, तंटामुक्ती अध्यक्ष अंतोष कालेकर, पोलीस पाटील मयूर विटले, ग्रामसेवक रुपेश शिंदे, माजी सरपंच जयवंत कालेकर, माजी उपसरपंच विकास कालेकर, ए. जी. हायस्कूल समिती सदस्य रवींद्र कालेकर, सीआरपी अनिशा कालेकर, बचत गट अध्यक्षा सीमा कालेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले. शिबिरातील सर्व उपक्रम प्रकल्प अधिकारी डॉ. स्कंधा खेडेकर आणि प्रा. जनार्दन गिरमकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली पार पडले. करंजणीतील स्मशानभूमीमध्ये उभारलेल्या विहिरीत पाणी लागल्याची विशेष उल्लेखनीय घटना विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली. विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकी, परिश्रमशीलता आणि ग्रामविकासासाठी केलेल्या कार्याचे संपूर्ण परिसरात जोरदार कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg