loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात दोन लाख ८४ हजार वाहनधारकांचे HSRP साठी ऑनलाईन अर्ज

ठाणे (प्रतिनिधी) - राज्यातील सर्वच वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवणे आता शासनाने बंधनकारक केल्याने ठाणे जिल्ह्यात याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर आतापर्यंत तब्बल दोन लाख ८४ हजार वाहनधारकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केला आहे. बनावट नंबर प्लेटमुळे होणारे गुन्हे, चोरीची वाहने, चुकीची ओळख आणि वाहतुकीशी संबंधित अनेक गुंतागुंतीचे प्रश्न लक्षात घेता, महाराष्ट्र शासनाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अनिवार्य केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ४ डिसेंबर २०२४ रोजी शासनाने आदेश जारी केला असून, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनधारकांना नवीन HSRP बसवणे आवश्यक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला गती मिळाली असून, आत्तापर्यंत दोन लाख ८४ हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी दोन लाख ७५ हजार वाहनधारकांना अपॉइंटमेंट देण्यात आली आहे. त्यापैकी २,०६,००० वाहनधारकांनी आपल्या वाहनावर नवीन HSRP यशस्वीरित्या बसवले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या कामासाठी परिवहन विभागाने तीन अधिकृत कंपन्यांची नेमणूक केली आहे. नागरिकांनी अनधिकृत विक्रेत्याकडून अशा प्लेट बसवू नयेत कारण अशा नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होत नाही. त्यामुळे त्याचे कायदेशीर महत्त्व राहत नाही.

टाइम्स स्पेशल

परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, ३१ डिसेंबर २०२५ नंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळ न घालवता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन HSRP साठी ऑनलाईन अर्ज भरावा, अपॉइंटमेंट घ्यावी आणि आपल्या वाहनावर ही प्लेट बसवून घ्यावी.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg