loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्ञान-विज्ञानाचा संगम: शृंगारतळीच्या अली पब्लिक स्कूलमध्ये भव्य प्रदर्शन

शृंगारतळी प्रतिनिधी गुहागर तालुक्यातील कौंढर येथील मौलाना शौकत अली नजीर एज्युकेशन सोसायटीच्या अली पब्लिक स्कूल मध्ये दि. 2 डिसेंबर रोजी विज्ञान आणि इस्लामिक प्रदर्शनाचे भव्य आणि प्रेरणादायी आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पाठपन्हाळेचे उपसरपंच असीम साल्हे,सामाजिक कार्यकर्ते गुलामभाई तांडेल, शृंगारी हायस्कूलच्या सौ.सौराज मॅडम, कांबळे सर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. फीत कापून मान्यवरांच्या हस्ते या द्विविध प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.उपसरपंच असीम साल्हे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आपले मत मांडले. ते म्हणाले, "या शाळेने केवळ पुस्तकी शिक्षण न देता, विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानासोबत नैतिक मूल्यांची शिकवण दिली आहे. ही दोन प्रदर्शने पाहिल्यावर लक्षात येते की,आपले विद्यार्थी भावी पिढीचे आधारस्तंभ आहेत."विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प केवळ मनोरंजक नव्हते, तर ते आजच्या समस्यांवर उपाय शोधणारे होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

'शेतीतील स्वयंचलित सिंचन'प्लास्टिक पुनर्वापर प्रकल्प' यांसारख्या विषयांवर उत्कृष्ट मॉडेल सादर केले. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता.एका विद्यार्थ्याने आपला प्रकल्प समजावून सांगितल्यावर उत्साहाने प्रतिक्रिया दिली, "हे मॉडेल बनवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत करावी लागली. पण जेव्हा मान्यवर आणि पालकांनी आमच्या कामाचे कौतुक केले, तेव्हा खूप आनंद झाला. अशा संधींमुळेच आम्हाला मोठे वैज्ञानिक होण्याची प्रेरणा मिळते.त्याचबरोबर आयोजित करण्यात आलेल्या इस्लामिक प्रदर्शनामुळे सामाजिक आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित झाले. ​विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातून 'शिक्षण आणि सेवा' ही दोन्ही तत्त्वे कशी महत्त्वाची आहेत, हे उत्तमरित्या सिद्ध केले.हा कार्यक्रम भव्य दिव्य आणि यशस्वी करण्यासाठी अली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांनी, संपूर्ण शिक्षकवृंदाने, पालक वर्गाने आणि व्यवस्थापन कमिटीने अहोरात्र मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg