loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये तालुका विधी सेवा समिती खेडमार्फत कायदेविषयक मार्गदर्शन

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड येथे विधी सेवा समिती खेड मार्फत विद्यार्थ्यांना उपयुक्त असे कायदेविषयक मार्गदर्शन सत्र पार पडले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक खेडच्या जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. निरगुडे, खेडचे सहदिवाणी न्यायाधीश, जी. एस. दिवाण व खेडचे दुसरे सहदिवाणी न्यायाधीश व स्तर श्री. जी. डी.पाटील यांचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे व रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्रीम.व्ही .टी. निरगुडे, जिल्हा न्यायाधीश-२, खेड यांनी पोस्को कायद्याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली. पोस्को कायद्याअंतर्गत येणारे सर्व गुन्हे व त्यांचे स्वरूप समजावले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून घडणारे गुन्हे विद्यार्थ्यांना अडचणीत आणू शकतात हे पटवून दिले. विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास पोस्को अंतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईची कल्पना दिली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना पोस्को कायद्याची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यानंतर श्री. जी. एस. दिवाण, सहदिवाणी न्यायाधीश व. स्तर, खेड यांनी अपंग व्यक्तीचे हक्क कायदा सन 2016 विषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा या दृष्टीने विकलांग व्यक्तींना या कायदयाचा महत्वाचा फायदा असल्याचे त्यांनी सांगितले, या कायदयाच्या अनुशंगाने विद्यार्थ्यांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात आदराची भावना निर्माण होण्यास मदत झाली. श्री. जी. डी. पाटील, दुसरे सहदिवाणी न्यायाधीश व. स्तर, खेड यांनी वैकल्पिक विवाद निराकरण पद्वती व त्याचे फायदे याविषयी महत्वपूर्ण माहिती सांगितली. सदर मार्गदर्शन सत्राला माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर व सर्व शिक्षक उपस्थित होते. उपस्थित सर्व मार्गदर्शकांचे रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे याच्या हस्ते आभारपत्र देऊन आभार मानण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता भारती यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg