loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्हालाल सुराणा यांचे निधन

पुणे- राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष, विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक पन्हालाल सुराणा यांचे निधन झाले. त्यांनी देहदान केले आहे. स्वातंत्र्य लढयापासून अखेरपर्यंत सामाजिक समतेचा लढा त्यांनी दिला. लोकशाहीच्या मजबूतीसाठी समाजवादी विचारांची पायाभरणी त्यांनी आयुष्यभर केली. सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य अंतिम माणसाच्या हितासाठी होते. राष्ट्रसेवा दलाचे काम करताना त्यांनी राज्यभर तरुणांमध्ये लोकशाही, समाजवाद जिवंत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे. डॉ. प्रकाश आमटे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करताना भाऊंच्या जाण्याने पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीचे कधीही भरुन येणार नाही, असे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नळदुर्ग येथील ‘आपलं घर’ येथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला. त्यामुळे सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात त्यांना रात्री उशिरा दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. संपूर्ण आयुष्य समजासाठी देणार्‍या साथी पन्नालाल सुराणा यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव शरीर शासकीय रुग्णालयाला देहदानासाठी समर्पित करण्यात आले. त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टाइम्स स्पेशल

समाजकारण, राजकारण आणि पत्रकारिता या तिन्ही क्षेत्रांमध्ये सत्तर वर्षांहून अधिक काळ कार्यरत राहून देशाच्या सामाजिक जडणघडणीचे काम केले. सोलापूर जिल्ह्यासाठी आणि राज्याच्या पुरोगामी चळवळीसाठी ही अतिशय दुःखद बातमी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg