loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ, घरफोडीत ४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल लंपास

खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील शेल्डी खालचीवाडी (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचा सोन्यादागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. ही घटना २० नोव्हेंबर रोजी पहाटे ६.३० वाजता ते २७नोव्हेंबर सायंकाळी ४.३० या दरम्यान घडली असून संतोष राजाराम आंब्रे (वय ५२) यांनी पोलिस ठाण्यात दिली. घरफोडीची नोंद २८ नोव्हेंबर रोजी सायं. ४.१६ वा. करण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे. आंब्रे बाहेरगावी असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दर्शनी दरवाजावरील पितळी कुलूप कोयत्यासारख्या कठीण हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळविली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चोरीला गेलेल्या वस्तूंमध्ये सोन्याचे ब्रेसलेट (२० ग्रॅम) १ लाख ६० हजार रुपये, सोन्याचा हार (२५ ग्रॅम) २ लाख रुपये, सोन्याची चैन ५ हजार ४०० रुपये, जेण्टस् अंगठी २ हजार ७०० रुपये, लेडीज अंगठी ६० हजार ५०० रुपये, सोन्याची नथ ५०० प्रत्येकी १ हजर ८०० रुपये, सोन्याची नथ (५ ग्रॅम) असा एकूण ४ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी नेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी अज्ञात आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg