loader
Breaking News
Breaking News
Foto

कोपरीत वाहतूक शिस्त मोहीम जोरात

ठाणे (प्रतिनिधी) - कोपरी वाहतूक शाखेने बेवारस, नो-पार्किंगमधील आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई करत फक्त नोव्हेंबर महिन्यात तब्बल २०० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नागरिकांकडून वाहतूक शाखेच्या सोशल मिडिया मोबाईल क्रमांकावर मिळणाऱ्या फोटोंवर तात्काळ प्रतिसाद देत ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. शांत प्रभाग म्हणून ओळख असलेल्या कोपरीत वाहनांची संख्या वाढत चालल्याने काही वेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. “कोपरीत कारवाई होत नाही” अशी नागरिकांची तक्रार नेहमीच ऐकू येत असली, तरी आता परिस्थिती पालटली आहे. दक्ष नागरिक आणि वाहतूक शाखेच्या समन्वयातून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर तातडीची कारवाई सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासाठी वाहतूक शाखेने विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. बेवारस वा चुकीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांचा फोटो या क्रमांकावर पाठवला की, वाहतूक पोलिस तत्काळ संबंधित ठिकाणी पोहोचून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करतात. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक शाखेचे पोलिस उपयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे कोपरीत वाहतुकीची शिस्त परत येत आहे. नागरिकांकडून या पद्धतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात २०० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यासाठी कोपरी हेल्पलाईन क्रमांक ७०३९००३८६६ आणि ८६५५६५ ४१७६ व्हाट्सअप क्रमांक दिला असल्याची माहिती कोपरी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg