loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनावलमध्ये वाघाच्या हल्ल्यात गोठ्यातील गाईचा मृत्यू; वनविभागाकडून तत्काळ बंदोबस्ताची मागणी

तिलारी (प्रतिनिधी) - रविवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, वाघाने चक्क गुरांच्या गोठ्यात घुसून हल्ला करत एका ५ वर्षांच्या गाईची शिकार केली आहे. ही गाय लक्ष्मण वरक यांची असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास वाघाने गोठ्यात बांधलेल्या गाईवर हल्ला चढवला, ज्यामध्ये गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वनविभाग अधिकारी कोळेकर आणि पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर चिन्मय पटकरे यांनी मृत गाईची पाहणी करून पंचनामा केला आहे. या हल्ल्यामुळे वरक कुटुंबीयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये संताप आणि भीती व्यक्त होत आहे. संदेश वरक यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, वनविभागाने या मोकाट फिरणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत आणि नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg