loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात भटक्या श्वानाच्या शरीवरून ट्रक गेल्याने श्वानाचा मृत्यू

ठाणे (प्रतिनिधी): ठाण्यात घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट परिसरात रस्त्यात बसलेल्या एका भटक्या श्वानाच्या शरीवरून ट्रक गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल आला आहे. श्वान प्रेमी महिलेला परिसरातून मोटारीने जात असताना तिला अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर तिने याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२९ नोव्हेंबरला हिरानंदानी इस्टेट भागात रस्त्यावर बसलेल्या भटक्या श्वानाच्या शरीरावरून ट्रक गेल्याची घटना घडली. या अपघातात श्वानाचा मृत्यू झाला. महिलेच्या तक्रारीनंतर याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० चे कलम ११ (१) (अ) आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg