पनवेल : पनवेलमध्ये सिडकोच्या जमिनीवर झालेल्या मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला असून, भाजपचे माजी नगरसेवक सुनील बहिरा यांच्यासह 12 जणांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्तीला जिवंत असल्याचे भासवून 11000 चौरस मीटरचा मौल्यवान भूखंड मिळवण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. सिडकोने सविस्तर तपास करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना तक्का गावातील बहिरा कुटुंबाशी संबंधित आहे. विष्णू बहिरा यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर सिडकोकडून संपादित जमिनीच्या बदल्यात त्यांच्या कुटुंबाला भूखंड मिळणार होता. मात्र, या भूखंडावर डोळा ठेवून काही जणांनी एकत्र येऊन फसवणुकीची योजना आखल्याचा आरोप सिडकोने केला आहे.तपासात असे उघड झाले की, विष्णू बहिरा मृत असल्याचे माहित असूनही त्यांच्या नावे बनावट ओळखपत्र तयार करण्यात आले. या ओळखपत्रावर विष्णू बहिरा यांचा फोटो न लावता सखाराम ढवळे यांचा फोटो बसवण्यात आला. ढवळे यांनाच विष्णू बहिरा असल्याचे भासवून विविध सरकारी कार्यालयांत कागदपत्रे सादर करण्यात आली. इतकेच नव्हे तर स्वाक्षऱ्याही ढवळे यांच्या घेतल्या गेल्या, ज्यामुळे सिडकोकडून मिळणाऱ्या 1100 चौरस मीटरच्या भूखंडावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न झाला.
ही बनावट कागदपत्रे 2006 सालापासून तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय आणि सिडकोच्या अनेक शाखांमध्ये वापरण्यात आल्याचे दस्तऐवज तपासात आढळले. भाडेपट्टा करारनामा आणि त्रिपक्षीय करार प्रक्रियेदरम्यानही ढवळे हेच विष्णू बहिरा म्हणून हजर राहिले होते. या सर्व व्यवहारांमधील विसंगती तपासात उघड झाल्याने सिडकोने चौकशी सुरू केली आणि अखेर पोलिसांकडे औपचारिक तक्रार दिली.विशेष म्हणजे, सुनील बहिरा यांनी अलीकडेच शेकापचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसातच त्यांचे नाव या मोठ्या जमीन गैरव्यवहारात समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.