संगलट खेड (इक्बाल जमादार) - दापोली सरस्वती विद्यामंदिर जालगाव येथे राज्यमंत्री योगेश कदम यांचे हस्ते ५३ वे तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शनाचे विज्ञानदिंडीने शानदार उद्घाटन संपन्न. शिक्षण विभाग पं.स.दापोली आणि सिध्दी शिक्षण संस्थेचे सरस्वती विद्यामंदिर जालगाव यांचे विद्यमाने तीन दिवसीय विज्ञान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून दि.४ डिसेंबर रोजी राज्यमंत्री योगेश कदम यांचे हस्ते व संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष समीर गुजराती यांचे अध्यक्षतेत शानदार विज्ञान दिंडीने प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. सदर प्रदर्शनात सुमारे १९५ प्रतिकृतींचे सादरीकरण होत असून बालवैज्ञानिकांच्या कल्पनेला बळ देऊन विकसित भारताच्या आत्मनिर्भरासाठी पालक आणि शिक्षक यांची प्रेरणा महत्वाची ठरत असून, भविष्यात दापोलीतून विविध क्षेत्रात या बालवैज्ञानिकांची प्रगती देशासाठी यशदायी, फलदायी ठरो अशी आशा मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केली. यावेळी उपविभागीय अधिकारी विजयकुमार सुर्यवंशी, तहसिलदार अर्चना बोंबे, माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, दापोली माजी सभापती किशोर देसाई, दिप्ती निखार्गे, मा.उपसभापती उन्मेष राजे, ममता शिंदे, नगराध्यक्षा कृपा घाग, निलेश शेठ, यांचेसह संस्थेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश सागवेकर, सदस्य गजानन दाभोळे, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, संघटना पदाधिकारी, मुख्याध्यापिका सारिका गुजराती, विश्वजीत तांबे आदि. उपस्थित होते. सरस्वती विद्यामंदिर मधील काजू प्रक्रिया उपक्रमाची राज्यस्तरीय"इन्स्पायर अवार्ड" स्पर्धेत उत्कृष्ठ म्हणून निवड झालेबद्दल मंत्री योगेश कदम यांचे हस्ते विशेष सत्कार करणेत आला.
प्रास्ताविक करतांना गटशिक्षणाधिकारी यांनी “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी S.T.E.M.” या विषयाची निवड ही केवळ शैक्षणिक उपक्रम नसून भविष्यातील भारताचा मजबूत पाया घालण्याची दृष्टी असून, Science, Technology, Engineering, Mathematics — ही चार अक्षरे आजच्या जागतिक स्पर्धेचे केंद्रबिंदू ठरली आहेत. या चारही क्षेत्रातील समन्वयानेच नव्या कल्पना जन्म घेतात, संशोधनाचा मार्ग मोकळा होतो आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक वेगाने होते. आजचे विज्ञानप्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, जिज्ञासा आणि चिंतनशक्तीचे कौतुकास्पद व्यासपीठ आहे. येथे साकारलेले प्रत्येक मॉडेल, प्रयोग आणि नवकल्पना ही आपल्या देशाच्या विकसित भारताच्या स्वप्नाला बळ देणारी मूल्यवान पायरी आहे. नवी ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, पर्यावरण संवर्धन, शेती, आरोग्य, अंतराळ— अशा अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवलेले कौशल्य निश्चितच अभिमानास्पद आहे.
भारताच्या प्रगतीचा मार्ग विज्ञानातूनच जातो, आणि विज्ञानाचा विकास युवा पिढीच्या उत्सुकतेतून. म्हणूनच, या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या हातून घडणाऱ्या नव्या कल्पनांचा प्रकाश भविष्यातील भारत उजळवील, असा विश्वास वाटतो. प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या सरस्वती विद्यामंदिर संस्थेचे, तालुक्यातील सर्व शिक्षकांचे, सहकाऱ्यांचे, तसेच विद्यार्थ्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. आपण सर्व मिळून S.T.E.M. शिक्षण अधिक सक्षम करू, तरच विकसित, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला आणि आत्मनिर्भर भारत घडवू असे पुढे बोलतांना गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी सांगितले. संपूर्ण सुत्रसंचालन आणि आभार स्वागत समिती प्रमुख शशिकांत बैकर आणि त्यांची सर्व समिती यांनी केले. प्रारंभी ढोलताशांच्या गजरात, ग्रंथ पालखीने जालगाव केंद्रशाळा ते सरस्वती विद्यामंदिर असे विज्ञानदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गटशिक्षणाधिकारी, रामचंद्र सांगडे, विज्ञान प्रदर्शन नोडल ऑफिसर बळीराम राठोड तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.