loader
Breaking News
Breaking News
Foto

सिद्धयोग विधी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम : मनीषा दळवी

खेड (प्रतिनिधी) - बालकांवर, महिलांवर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण वाढत आहेत. विनापरवाना वाहने चालवली जात आहेत, अल्प वयीन मुले सुद्धा टू व्हीलर चालवताना दिसतात, एकंदर असे म्हणता येईल की कायद्याचे गांभीर्य नागरिकांमध्ये राहिलेले नाही. याबाबतची जाणीव खेड येथील सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे यांना झाली असून त्यांनी त्याची दखल घेऊन त्यांच्या महाविद्यालयाच्या "दायित्व" उपक्रमांतर्गत विविध कायदेविषयक मार्गदर्शन ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, विद्यालय, महाविद्यालय त्यांच्याकडे जाऊन देतात, त्यांच्या या कायदेविषयक जनजागृती चा उपक्रम चांगलाच जोर धरत असून अनेक गावातील ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा विद्यालय महाविद्यालय यांकडून मागणी होत आहे आणि हा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन दिवळेवाडी (नांदगाव)पोलीस पाटील मनीषा दळवी यांनी नुकतेच नांदगाव प्राथमिक शाळेत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक ऍड.दिलीप चव्हाण यांनी नांदगाव प्राथमिक शाळेत जाऊन बाल लैंगिक शोषण, बाल संरक्षण ,मोटर वाहन कायदा आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करावा व व्यक्तिमत्व विकास याविषयी सविस्तर माहिती देऊन बहुमूल्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रमुख आयोजक म्हणून श्रीमती दळवी बोलत होत्या. प्राध्यापक ॲड दिलीप चव्हाण हे व्यवसायाने वकील असून आपला अमूल्य वेळ खर्चून ते खेड-चिपळूण-गुहागर-दापोली-मंडणगड-पोलादपूर येथील शैक्षणिक संस्थेत जाऊन ज्ञानार्जन करतात ही त्यांची शैक्षणिक बांधिलकी समाजास फार मोलाची आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

असे कायद्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे, असे नांदगाव तंटामुक्ती अध्यक्ष मस्तुफा कादीरी यांनी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक सुदेश जाधव यांनी प्रास्ताविक केले दर्शना निवळकर यांनी सूत्रसंचालन तर दर्शना शिगवण यांनी आभार मानले . कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिक्षक दर्शना निवळकर, विद्या घाडगे, दर्शना शिगवण, अंगणवाडी सेविका वर्षा मेटकर, सुदेश जाधव,(मुख्याध्यापक) सिद्धार्थ बल्लार, पोलिस पाटील अरविंद तांबट या सगळ्यांनी प्रा. ऍड चव्हाण यांचे आभार मानले. आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg