loader
Breaking News
Breaking News
Foto

मठ येथील स्वयंभू श्री दत्त मंदिरामध्ये दि. २ ते ४ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती उत्सव

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - कोकणातील भाविकांसाठी प्रति नरसोबाचीवाडी म्हणून प्रसिद्ध ठरलेल्या आंजणारी पूलाच्या लगत मठ येथील श्री क्षेत्र अवधुत वन स्वयंभू श्री दत्त मंदिरामध्ये दि .२ ते ४ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. लांजा शहरापासून ११ किमी अंतरावर आंजणारी पुलानजीक मठ येथे काजळी नदीच्या विशाल पात्रालगत आणि अतिशय रमणीय अशा परिसरात स्वयंभू श्री दत्त स्थान देवस्थानाचे अतिशय सुबक आणि देखणे हे मंदिर उभारण्यात आले आहे. अध्यात्मिक निर्मितीचा वारसा लाभलेल्या या ठिकाणाला राज्य शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मंदिरालगतच काही फुटांच्या अंतरावर गरम पाण्याची आणि कोमट पाण्याचे दोन नैसर्गिक झरे आहेत. हे झरे बारमाही वाहणारे आहेत. दत्तजयंतीनिमित्त या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते ९ वाजता श्रींची पूजा व अभिषेक, त्यानंतर दत्तयाग व आरती, दुपारी १.३९ ते ३.३० या कालावधीत महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. तर ३.३० ते ५ या वेळेत प्रभानवल्ली येथील जाधव बुवा यांच्या भजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. रात्री आरत्या हरिपाठ, प्रदक्षिणा असे कार्यक्रम होतील.

टाईम्स स्पेशल

दि.३ रोजी सकाळी श्रींची पूजा व अभिषेक, दत्तयाग व आरती, दुपारी महाप्रसाद, भजन, आरती, सायंकाळी ७.३० ते ९ भजन, प्रदक्षिणा असे कार्यक्रम होतील. गुरुवारी दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता श्रींची महापूजा, दुपारी महाप्रसाद, ३ वाजता भजन, सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री दत्त जन्म उत्सव किर्तन, रात्री आरती, प्रदक्षिणा असे कार्यक्रम होतील. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पवार, उपाध्यक्ष शशिकांत गुणे यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य मेहनत घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg