loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांची नात इरा जोशी हिने कोरले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव

मुंबई (प्रतिनिधी) - मुंबईतील जोगेश्वरी मसाजवाडी येथील १० वर्षांच्या चिमुकल्या इरा संपदा पराग जोशी हीने एका मिनिटात (हूला हुप घूमाव) पायात १७३ वेळा रींग फीरवणेचा विक्रम करत आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मधे नोंद करण्यात यश मिळविले आहे. एस. एम. शेट्टी इंटरनॅशनल स्कूल पवई या शाळेची विद्यार्थिनी असून ती कोविड काळापासून हुला हूप हा खेळ online पाहून शिकली आहे, तीला चेन्नई येथील चेन्नई हुपर ट्रैनिंग अकॅडमी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याअकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली चेन्नई येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सहभागी होत तीने या विक्रमाला गवसणी घालत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मधे आपले नाव कोरले..

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इरा ही जोगेश्वरी येथील प्रसिद्ध व्यावसायिक सुभाष (नाना) सप्रे(वडेवाले) व जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे यांची नात आत आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे खासदार रविंद्र वायकर, सौ. मनिषा वायकर, विक्रोळी आम.सुनिल राऊत, जेष्ठ कामगार नेते बाबा कदम यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg