loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली शहरात एडस् जनजागृती प्रचारफेरी

दापोली - जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप व जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील व दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. गोरिवले यांचे मार्गदर्शनाखाली एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र, उपजिल्हा रुग्णालय दापोली व दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज दापोली यांचे संयुक्त विद्यमाने दापोली शहरात एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभातफेरीची सुरूवात उपजिल्हा रुग्णालय दापोली येथून दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चे रेड रिबन क्लब चे नोडल ऑफिसर डॉ. माधुरी साठे, उपजिल्हा रूगणालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय कवचट यांचे हस्ते झेंडा दाखवून करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर प्रभातफेरी संपूर्ण दापोली शहरातून फिरुन प्रभातफेरीची सांगता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे झाली. सदर प्रभातफेरीस उपजिल्हा रुग्णालय दापोली येथील डॉ. अजय कवचट, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे डॉ. माधुरी साठे, डॉ.होन, डॉ. जाधव, डॉ. संकेत आसवले, परिसेविका एन. वाय. जाधव अधिपरिचारिका, साक्षी हांडे, प्रिया वंडकर, सपना राठोड, अस्मिता जाधव औषधनिर्माण अधिकारी पवार, प्रयोगशाळा सहाय्यक गिक्ते, संतोष झिमण तसेच उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चे सर्व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

प्रभातफेरीचे यशस्वी करण्यासाठी आयसीटीसी समुपदेशक पांडुरंग हुबाले, सागर बुरटे व रेड रिबन क्लब दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज दापोलीचे नोडल आफिसर डॉ.माधुरी साठे व मेडिकल कॉलेज चे व्यवस्थापन कमिटी यांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg