loader
Breaking News
Breaking News
Foto

निवासी शिबिराच्या माध्यमातूनच विद्यार्थी देश घडवण्यासाठी सक्षम बनतात - सुरेश भायजे

पूर्णगड - श्रमिक किसान सेवा समिती संचालित रत्नागिरी लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे रत्नागिरी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित पंधरावे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर ग्रुप ग्रामपंचायत पूर्णगड येथे संपन्न झाले. दिनांक 3 डिसेंबर 2025 ते 9 डिसेंबर 2025 या सात दिवसांच्या या निवासी शिबिराचा उद्घाटन समारंभ आज अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. या विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराच्या प्रमुख उद्घाटक म्हणून सुहासिनी धानबा (सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पूर्णगड) म्हणून लाभल्या. श्रमिक किसान सेवा समितीचे संस्थापक निसर्गवासी नंदकुमारजी मोहिते यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांचा बौद्धिक सामाजिक आणि सर्वांगीण विकास घडवण्याच्या उद्देशाने या निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या निवासी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्रमिक किसान सेवा समितीचे अध्यक्ष सुरेश भायजे त्याचप्रमाणे, संस्थापिका साधनाताई मोहिते, श्रमिक किसान सेवा समितीचे सचिव राजस मोहिते, सहसचिव विजय मोहिते सहसचिव अविनाश डोर्लेकर, कोषाध्यक्ष विश्वनाथ खानविलकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रमोद वारीक, पूर्णगड ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच आजमीना दर्वेश, सदस्या आचल हरचकर, सदस्या प्रणिता हरचकर, सदस्या रिया सुर्वे, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पूर्णगड मराठी नंबर दोनच्या मुख्याध्यापिका भारतीताई शेट्टी, उपशिक्षक राजेंद्र रांजणकर, पोलीस पाटील संतोष पाथरे, प्रकाश पवार अध्यक्ष पूर्णगड बौद्धजन ग्रामीण विकास मंडळ त्याचप्रमाणे दशरथ धानबा, प्रणय धानबा आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अशा विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर बनले पाहिजेत असे निर्भिड विचार आपल्या वक्तव्यातून सुहासिनी धानबा यांनी व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे विद्यार्थी परावलंबाकडून-स्वावलंबाकडे कसा जाईल? आपले व्यक्तिमत्व कसे खुलवेल? की जेणेकरून तो आपला भारत देश घडवण्यासाठी कर्तव्यदक्ष बनेल असे मौलिक विचार अध्यक्ष सुरेश भायजे यांनी व्यक्त करून विद्यार्थ्यांना या निवासी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव राजस मोहिते यांनी देखील विद्यार्थ्यांना संबोधन करताना शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी कृतीशील बनला पाहिजे आणि स्वयंपूर्ण बनला पाहिजे यासाठी त्यांनी या सात दिवसात स्वतः कौशल्य निर्माण केली पाहिजेत असे महत्त्वपूर्ण विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी प्राध्यापिका कल्पना मेस्त्री यांनी देखील आपल्या प्रास्ताविकेतून विद्यार्थ्यांना संबोधित करताना मत मांडले की विद्यार्थ्यांनी येत्या सात दिवसांमध्ये कोणकोणत्या जबाबदाऱ्या सांभाळल्या पाहिजेत आणि स्वतःला स्वयंपूर्ण बनवले पाहिजेत असे अत्यंत मार्मिक शब्दात अभिमत व्यक्त केले. या निवासी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी हितचिंतक असे अनुभवी मान्यवर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी अत्यंत उत्साहातून उपस्थित राहिले होते. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वयंसेवक सानिका सुरेंद्र पोतकर हिने व्यक्त करून या उद्घाटन समारंभाची यशस्वीरित्या सांगता केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg