loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त जिल्हास्तरीय शालेय निबंध स्पर्धा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडीत २८ डिसेंबरला आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्याधर भागवत स्मृती जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी पहिल्या तीन क्रमांकाना प्रत्येकी १ हजार, ७०० आणि ५०० रुपये तर उत्तेजनार्थ दोन क्रमांकाना २५० रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. तसेच विजेत्यांना स्मृतिचिन्ह, पुस्तक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेसाठी १. आधुनिक जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय किती महत्वाची?, २. बदलती वाचन संस्कृती ३. गरज कोकणची लोककला जपण्याची हे तीन विषय आहेत. शब्दमर्यादा ५०० ते ७०० असून निबंध स्वलिखित असावा. निबंध कागदाच्या एका बाजूवर स्वलिखित असावा. त्यासोबत आपले नाव, पत्ता, शाळा आणि मोबाईल याचा उल्लेख असलेला स्वतंत्र कागद जोडावा. शक्य असल्यास मुख्याध्यापकांचे संमतीपत्र जोडावे.

टाईम्स स्पेशल

निबंधाच्या अखेर संदर्भासाठी वापरलेल्या पुस्तकांचा उल्लेख करावा. आपले निबंध स्वहस्ते, पोस्टाने १५ डिसेम्बरपर्यंत पोहोचतील या बेताने ग्रंथपाल, श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी, सिंधुदुर्ग ४१६५१० या पत्त्यावर पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी भरत गावडे ९४०३०८७७९६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संमेलन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg