loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला खिंडार, हर्णे जि.प.गटात नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

दापोली - कोकंबाआळी येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे हर्णे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष अज्ञानी वरवडेकर,तसेच हर्षद दातार, विक्रांत म्हसकर यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. यावेळी सर्वांचे नामदार योगेशदादा रामदासभाई कदम यांनी शिवसेनेत जाहीर स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मतदारसंघात सुरू असलेली विकासकामे आणि शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास यातूनच हा पक्षप्रवेश होत आहे. राज्यात शिवसेनेच्या जनहितकारी निर्णयांमुळे, विकासाभिमुख कार्यपद्धतीने प्रभावित होऊन अनेक दिवसांपासून विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत शिवसेनेत सामील होत आहेत. याप्रसंगी दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई ,माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे ,मुरूड ग्रा.माजी सरपंच सुरेश तुपे, संजय महाडीक, मोहन शिगवण, सुभाष झगडे, जयवंत रेवाळे, सुनिल गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg