loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निवेदन सादर

खेड : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त खेड तालुक्यातील महत्त्वाच्या शासकीय अधिकाऱ्यांना दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच खेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना हे निवेदन सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेटून सुपूर्द केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनुज जोशी, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, सामाजिक कार्यकर्ते उत्तमकुमार जैन, भूषण काणे, स्नेहज्योती अंध विद्यालय शाळा समिती सचिव संदीप सुखदरे आदी मान्यवर उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींचे हक्क सुरक्षित व्हावेत, त्यांना आवश्यक सुविधा, सन्मान आणि समान संधी मिळाव्यात यासाठी दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ ची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी सकारात्मक चर्चा करताना नगरपरिषदेमार्फत दिव्यांगांसाठी सानुग्रह अनुदान देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावाची माहिती दिली. उपस्थित कार्यकर्त्यांनी पत्रात नमूद केलेल्या कलमांवर सविस्तर चर्चा करताना सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी अनिवार्य असणाऱ्या खालील मुद्द्यांवर तत्काळ कृतीची गरज व्यक्त केली— सरकारी कार्यालयांत सुलभ प्रवेशद्वार, रॅम्प, ब्रेल साईनज, स्वच्छतागृहे उपलब्ध करणे. सर्व शासकीय सेवेचा समान व सुलभ लाभ देणे, तक्रार निवारणासाठी आवश्यक सुलभ व्यवस्थापन व्यवस्था उभारणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दिव्यांग संवेदनशीलता प्रशिक्षण, दिव्यांग प्रमाणपत्र व सुविधा मिळविण्याच्या प्रक्रिया गतिमान करणे, अनुज जोशी यांनी दिव्यांग बांधवांच्या मूलभूत हक्कांचा सन्मान राखत सर्वच विभागांनी कायद्याप्रमाणे सुसज्ज सेवा देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे ठामपणे नमूद केले. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता शासकीय कार्यालयांनी दिव्यांग नागरिकांचे सन्मानपूर्वक मार्गदर्शन व सेवा देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. समावेशक आणि न्याय्य समाज निर्मितीसाठी दिव्यांग बांधवांच्या हक्कांचे संरक्षण हे सर्वांचे कर्तव्य असल्याचा एकमताने उच्चार करत, संबंधित विभागांनी तातडीने कृती आराखडा राबवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg