loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय 'इतिहास कार्यशाळा' उत्साहात संपन्न

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेड येथे श्री शिवशंभु विचारमंच, रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हास्तरीय इतिहास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमासाठी भारत इतिहास संशोधन मंडळाचे सचिव पांडूरंग बलकवडे, शिवाजी रायगड स्मारकचे कार्यवाहक सुधीर थोरात, शिवशंभू विचारमंच संयोजक रुपेश मोरे, डॉ. परेश मळणगांवकर, डॉ. शिंदे, संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यशाळेचा मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा अभ्यास आधुनिक दृष्टीकोनातून करणे हा होता. सुप्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी शिवछत्रपतींच्या विचारधारा, दुर्गरचना, स्थापत्यशास्त्र, अष्टक्रांती आणि रणनिती यांच्या आधारे शिवकाल समजून घेण्याचा नवा मार्ग उपस्थितांसमोर मांडला. महाराजांच्या शौर्यकथांचा उल्लेख करतानाच त्यांच्या निर्णयांचे गूढ आणि दूरदृष्टी स्पष्ट करणाऱ्या त्यांच्या प्रभावी भाषणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. तसेच इतिहास संवर्धनातील मोडी लिपीचे महत्त्व सविस्तर उलगडत रुपेश मोरे यांनी मराठ्यांच्या प्रशासनातील दस्तऐवजीकरण, शासनव्यवस्था आणि मूळ लेखनसंपदेचे महत्व अधोरेखित केले. मोडी लिपी ही केवळ अक्षरे नसून मराठी इतिहासाची किल्ली असल्याचे त्यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

या कार्यशाळेचे आयोजन इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. परेश मळणगांवकर यांच्या प्रयत्नातून साकार झाले. त्यांचे मार्गदर्शन, अभ्यासदृष्टिकोन आणि नियोजनामुळे उपस्थितांना इतिहासाचा अभ्यास संशोधनात्मक पद्धतीने करण्याची प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमामुळे इतिहास, संशोधन आणि मराठी वारसा जतन करण्याबाबतची जिज्ञासा व अभिमान अधिक दृढ झाला. रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg