loader
Breaking News
Breaking News
Foto

महायुतीमधील वादविवादावर पडदा टाकण्याचा निर्णय; २०२९ पर्यंत सरकार सुरळीत चालवण्यावर भर - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान महायुतीतील घटकपक्षांमध्ये झालेले आरोप-प्रत्यारोप आता थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी २०२९ पर्यंत राज्य आणि केंद्र सरकार सुरळीतपणे चालावे, ही आमची धारणा आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर घडलेल्या काही गोष्टींवर ’पडदा टाकण्याचा’ निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होणे स्वाभाविक आहे, मात्र महायुतीत आम्ही एकत्रित सत्तेत आहोत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आहेत. महाराष्ट्राला गतीमान करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे चव्हाण म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चव्हाण यांनी सांगितले की, काही घटनाक्रमांमुळे विषय पुढे येत राहिले. मात्र, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असून, हे विषय अधिक वाढवू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. घडलेल्या काही गोष्टींवर पडदा टाकण्याचा निर्णय झाला आहे, असे त्यांनी सांगितले. कल्याण-डोंबिवलीसह काही भागांमध्ये शिवसेना आणि भाजपकडून झालेल्या पक्षप्रवेशांवर आक्षेप आहेत. यावर लवकरच वरिष्ठ मंडळी बसून चर्चा करणार आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान याबाबत बैठक होण्याची शक्यता आहे. यापुढे आपसातील लोकांचे प्रवेश घेऊ नये, असा निर्णय घेतल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार केंद्रात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार गतीमान पद्धतीने काम करत आहे. वर्षभरात सरकारने केलेल्या कामाचा आढावा घेत, महायुतीचे सरकार महाराष्ट्राला अधिक गतीमान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य असुविधांबाबत पत्रकारांनी विचारले असता, चव्हाण यांनी उत्तर देणे टाळले. यावेळी पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, विशाल परब, श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, मनिष दळवी, रणजीत देसाई, बबन साळगावकर, अ‍ॅड. अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक आदींसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg