loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनेच्या दोन्ही गटांनी सौ.हुस्नबानू खलिफे (राजापूर), सौ. पूर्वा मुळे (लांजा) व सौ. सबुरी थरवळ (देवरुख) या तीनही रणरागिणींना विजयी करा : चंदुभाई देशपांडे

राजापूर न.प.च्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. हुस्नबानू खलिफे, लांजाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. पूर्वा मुळे व देवरुखच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. सबुरी थरवळ या ३ रणरागिणी निवडणुक रिंगणात मोठ्या ताकदीने उतरल्या आहेत. या तिघी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांना शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार), इं. कॉंग्रेस, शेकाप व वंचित बहुजन आघाडी अशा दिग्गज पक्षांचे एकमुखी पाठबळ लाभले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सौ. हुस्नबानू खलिफे यांनी यापूर्वी राजापूरचे नगराध्यक्षपद भुषविलेले आहे. तसेच त्या विधान परिषदेवर सहा वर्षे आमदार होत्या. या काळात त्यांनी राजापूर नगरीसाठी फार मोठे विकास कार्य केले. तसेच लांजा, कुवेच्या उमेदवार सौ. पूर्वा मुळे या देखील प्रशासन कुशल व अनुभव संपन्न नेत्या म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी त्या दोन वेळा नगरसेवक म्हणून बहुमताने निवडून आल्या होत्या, त्या काळात त्यांनी अतिशय कार्यक्षमपणे कारभार पाहिला. देवरुखच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सबुरी थरवळ या देखील दोनवेळा नगरसेवक पदी निवडून आल्या होत्या, त्यांनीही देवरुखच्या विकासात मोठा हातभार लावलेला आहे.

टाइम्स स्पेशल

या तीनही रणरागिणी सुसंस्कृत, विनयशील, कर्तबगार व जनतेसाठी तळमळीने काम करणार्‍या आहेत. तिघांचेही आपापल्या शहरासाठी फार मोठे योगदान आहे, त्या प्रशासन कुशल व अनुभव संपन्न नेत्या आहेत. तरी शिवसेनेच्या दोन्ही गटांनी तसेच मतदार बंधु भगिनींनी त्यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहन अखंड शिवसेनेचे भूतपूर्व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. चंदुभाई देशपांडे यांनी केले आहे. श्री. चंदुभाई देशपांडे यांचे वय सुमारे ८५ वर्षे इतके असून ते ‘तरुण योध्दा’ म्हणून ओळखले जातात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg