loader
Breaking News
Breaking News
Foto

खरे गद्दार बाळ माने, त्यांनी पक्षाशी, विचारांशी व आणखी कुणाशी गद्दारी केली ते आठवावे : श्री. बशीरभाई मुर्तूझा

रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी सौ. वहिदा बशीर मूर्तूझा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांचे पती श्री. बशीरभाई मुर्तूझा यांनी सांगितले की, ‘‘मी राष्ट्रवादी (शरद पवार) चा महाराष्ट्राचा सरचिटणीस होतो. त्यांच्याबद्दल अजूनही आमच्या मनात अतिव आदराची भावना आहे. आम्ही त्यांना सोडलेले नाही व कदापि सोडणार नाही. आम्ही लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उबाठाला सहाय्य केले. आता न.प.मध्ये आम्हाला नगराध्यक्षपद मिळावे एवढीच आमची मागणी होती. परंतु त्यांनी परस्पर निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही समान विचारधारेचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातर्फे नगराध्यक्षपदाची निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला.’’

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री. बशीरभाई मूर्तूझा यांनी पुढे सांगितले, ‘‘बाळ माने याला गद्दारी म्हणत असतील तर त्यांनी जे केले त्याला काय म्हणावे? ते भाजपमध्ये होते.. गद्दारी करुन दुसर्‍या पक्षात गेले. तसेच त्यांनी आजवर काय काय केले? ते सारे येथील नागरिकांना पुरेपुर ठाऊक आहे.. त्यांच्याबद्दल काय बोलावे? जर कुणी गद्दारी केली असेल तर ती बाळ माने यांनीच केली आहे. त्यांनी पक्षाशी गद्दारी केली, विचारांशी गद्दारी केली आणि कुणा कुणाशी गद्दारी केली ते त्यांनी आठवावे. लोकांना सर्व ठाऊक आहे’’ अशा खणखणीत शब्दात त्यांनी बाळ मानेंचा समाचार घेतला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg