loader
Breaking News
Breaking News
Foto

रूग्ण सेवाकरीता आपले कार्य प्रामाणिक बजावण्यासाठी देवांग नर्सिंग स्कूल लांजाच्या विद्यार्थीनींनी घेतली शपथ

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - विद्यादीप एज्युकेशन संस्था मुंबई संचलित देवांग नर्सिंग स्कूल लांजा या ठिकाणी नर्सिंगच्या विद्यार्थिनींचा लॅम्प लाइटिंग करून शपथ ग्रहणाचा कार्यक्रम पार पडला. नर्सिंग क्षेत्राशी जोडल्या जाणा-या नव्या परिचारिका सर्वात आधि द नाईटिंगल प्लेज ही रुग्णाच्या सेवेशी निगडीत प्रतिज्ञा घेतात तसेच जावळी जगातील पहिली परिचारिका प्लोरेंन्स नाईटिंगेल यांनी मेणबत्ती घेऊन रुग्णांची सेवा केली त्याचप्रमाणे आपण देखील रुग्णाची अविरतपणे सेवा करून त्याच्या आयुष्यातील अंधार दुर करून त्यांना प्रकाशाकडे नेऊ यासाठी लॅम्प लाइटिंग करुन शपथ घेतली जाते अशीच शपथ रुग्णसेवा करीत आपले कार्य प्रामाणिकपणे बजावण्यासाठी नर्सिंग चा कोर्स करणा-या देवांग नर्सिंग स्कूल च्या विद्यार्थीनि शपथ घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी देवांग नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य प्रियांका खानविलकर , विद्यादीप ज्युनिअर कॉलेज लांजाचे प्राचार्य अमोल जाधव. विद्यादीप इंग्लिश हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक संतोष खेतल, सर्व अध्यापिका नेत्रा लांजेकर, सिंथीया तळसंदेकर, श्रुती गुंडये, मनीषा जाधव, पाटील आणि सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक परिवार या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश लाखन यांनी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg