loader
Breaking News
Breaking News
Foto

जोगेश्वरी येथे ग्रेट मराठा प्रतिष्ठान- दापोली आयोजित ग्रेट मराठा चषक - २५ स्पर्धा उत्साहात

देवळे (प्रकाश चाळके) - रविवार दिनांक 30/11/2025 रोजी ग्रेट मराठा प्रतिष्ठान दापोली यांनी इस्माईल युसूफ कॉलेज जोगेश्वरी मुंबई येथे " ग्रेट मराठा चषक : २५ " भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये दापोली आणि राजापूर तालुक्यातील एकूण 16 संघ सहभागी झाले होते. दापोलीतील 13 संघांनी तर राजापूर मधील 3 संघ अश्या 16 संघाचा सहभाग होता. त्यामध्ये श्रीशा 11 कारंजाणी, या संघाने प्रथम पारितोषिक आणि रोख रक्कम 50000 बक्षीस पटकावले, कालकाई क्रिकेट संघ वाकवली यांनी द्वितीय पारितोषिक 25000, बक्षीस पटकावले तसेच प्रत्येक सामन्यमध्ये सामनाविराला सुंदर असे टी शर्ट माजी सभापती दापोली कै. श्रीपतराव (दादा ) गणपतराव पवार यांच्या स्मरणार्थ सुनील वसंतराव पवार यांच्याकडून देण्यात आले. तसेच या स्पर्धेत सर्व पराभूत संघाचे सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. आलेल्या सर्व विजेता आणि पराभूत संघांचे मनापासून आभार धन्यवाद मानण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्ध्येचा बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी जोगेश्वरी पूर्वचे आमदार अनंत(बाळा) नर तसेच दापोली खेड मंडणगड तालुक्याचे मराठा विद्याप्रचारक मंडळाचे अध्यक्ष सुनील दळवी तसेच जोगेश्वरी उपविभाग प्रमुख जयवंत लाड तसेच मराठा समजणोत्ति संस्था मुंबई अध्यक्ष रणजित जाधव इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच या स्पर्धेची पूर्ण जबादारी आणि तयारी ग्रेट मराठा प्रतिष्ठान दापोलीची संपूर्ण टीम विलास जाधव, संजय पवार, गजानन गायकवाड, हेमंत पवार, संदेश कदम, विकास पवार, सुनील पवार यांनी सांभाळली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg