loader
Breaking News
Breaking News
Foto

इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचे प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश

तळवडे - गुरुवर्य बी.एस.नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांनी ५३ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यश संपादन केले. या प्रदर्शनात अंतर्गत आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत इयत्ता सहावी ते आठवी या गटात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत इयत्ता आठवीतील वेदांत उदय पाटकर तर इयत्ता सातवीतील पियुष संजय परब या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका प्रियांका गावडे व सुखदा कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मैथिली मनोज नाईक, मुख्याध्यापक अजय बांदेकर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg