loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या पहिल्या नमनाचा रौप्य महोत्सवी प्रयोग दत्त मंदिर घुडे वठार येथे होणार सादर

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रिडा मडळ रत्नागिरी या सस्थेने महाराष्ट्रातील पहिले असे कोकणची सांस्कृतिक कला जपण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील महिलांचे पहिले नमन रंगभूमीवर आणले आहे आणि ते आता संपूर्ण जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्र राज्यात सर्वत्र विविध माध्यमातून गाजत आहे. यासाठी त्यांच्या दूरदृष्टीत्वाचे मनापासून सर्वत्र कौतुक होत आहे. विविध ठिकाणी या मंडळाचे प्रयोग सादरीकरण होत आहेत. या मंडळाने कोकणची नमन कला हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केलेला हा प्रयत्न सफल होताना दिसत आहे. महिला कलाकारांनी सादर केलेले नमन हे एक शिवधनुष्य उचलल्या सारखेच आहे आणि आता एक पाऊल पूढे टाकत या नमन मंडळाचा रौप्य महोत्सवी नमनाचा कार्यक्रम दि 3/12/2025 रोजी रात्रौ 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत एकमुखी दत्तमदिर घुडे वठार रत्नागिरी येथे साजरा होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लेखक दिग्दर्शक नमनसम्राट यशवंत वाकडे, निर्माता साईनाथ नागवेकर, आभारचे अध्यक्ष विनोद हळदवणेकर, विशेष सहाय्य दादा वाडेकर, शरद गोळपर, मदन डोर्लेकर, (गुरूजी) सुत्रधार वासुदेव वाघे, सागर मायगडे हे सहाय्य करत असून या नमनातील गीते सर्वता चव्हाण यांनी लिहलेली असून मुख्य गायिका आकांक्षा वायंगणकर, सर्वता चव्हाण, वेदा शेट्ये या गीते गात आहेत. या मध्ये कलाकार प्रेरणा विलणकर, ज्योती कदम, रेश्मा शिंदे, पूनम गोळपकर, अर्चना मयेकर, रेखा खातू, विनया काळप, मनस्वी साळवी, सर्वता चव्हाण, रिमा देसाई, गीता भागवत, पूर्वा चव्हाण, समिक्षा वालम, आकाक्षा वायंगणकर, तन्वी नागवेकर, शीतल सकपाळ, जुई पावसकर, शोभना वरवटकर, शमिका विलणकर, वेदा शेट्ये, माधवी पाटील, स्वीटी पावसकर, निधी वरवटकर, या भूमिका करत आहेत तर नेपथ्य रचना बावा आग्रे (लांजा)हे सांभाळत आहेत. तरी हा महिलांनी सादर केलेला नमनाचा कार्यक्रम आवर्जून पहावा व या सर्व कलाकारांना प्रोत्साहित करावे असे रसिक श्रोत्यांना आवाहन करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg