loader
Breaking News
Breaking News
Foto

ओंकार हत्ती अत्याचार प्रकरणी चौकशीला वेग; चार दिवसांत निर्णयाची हमी

बांदा (प्रतिनिधी) - ओंकार हत्तीवर लाठीमार करणार्‍या अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार्‍या ओंकारप्रेमींच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. वनपरीक्षेत्र अधिकारी सुहास पाटील यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून पुढील चार दिवसांत निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, श्रीराम चौकात सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण चौथ्या दिवशी सायंकाळी स्थगित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ओंकारवरील अत्याचाराच्या निषेधार्थ स्थानिकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. सायंकाळी सुहास पाटील आणि वनरक्षक अतुल पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. गुणेश गवस, मंदार गावडे, प्रा. राजेंद्र केरकर, हेमंत वागळे, संजय सावंत, ऋषीं हरमलकर, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या उपस्थितीत चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दांड्याने मारहाण करणार्‍या व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पुन्हा ठामपणे मांडली. वनविभागाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी कठोर भूमिका मागे घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

उपोषणकर्त्यांचा विजय

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg