loader
Breaking News
Breaking News
Foto

अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार : नाना पटोले

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या आज 3 डिसेंबर रोजीच्या निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे, आता 2 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये, विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोपही केले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यानंतर आता माजी मंत्री तथा आमदार नाना पटोले यांनीही निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणण्याची मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कायदा सर्वांसाठी सारखा आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असो की निवडणूक आयुक्त असो ते संविधानाच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. आम्ही राज्य सरकारला प्रस्ताव दिला आहे की, त्यांनी आर्टिकल 243 अंतर्गत राज्यच्या मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग आणला पाहिजे. राज्य सरकार प्रस्ताव आणणार नसेल तर आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी राज्याच्या निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा प्रस्ताव आणू , असे काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनी माध्यम प्रतिनिधीकडे बोलताना म्हटले.

टाइम्स स्पेशल

राज्य सरकारला आमची भूमिका राजकीय वाटत असेल. पण, गुन्हा केल्यानंतर गुन्हेगाराला सोडले तर याला काय म्हणायचे? खरतर निवडणूक आयोगाच्या भूमिकाच राजकीय आहेत. राज्य सरकार महाभियोग आणणार नसेल तर निवडणूक आयोग व राज्य सरकार यांचे साटेलोटे असल्याचे उघड होईल, असा आरोपही नाना पटोले यांनी केला. गडचिरोलीत तहसीलदाराला स्वतः निवडणूक आयोग एव्हीएमची बॅटरी बदलवायला सांगतात मग 18 दिवस ईव्हीएम सुरक्षित राहील का? याबद्दल आम्हाला शंका आहे, असेही नाना पटोले यांनी म्हटले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg