loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्योजिका शमा केसकर (बुटाला) यांना "कोकण रत्न पदवी-२०२५" जाहीर

दापोली : महाराष्ट्रातील कोकण कन्येने आपल्या स्वकर्तृत्वावर यशाचे शिखर गाठत अमेरिकेत सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या व सर्वश्रेष्ठ असणाऱ्या 'दी टॉप वूमन लीडर्स ऑफ इअर २०२५' या किताबाला गवसणी घातली आहे. हा सर्वोच्च सन्मान मिळवणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला असणार आहेत. रत्नागिरी जिल्हयात खेड तालुक्यातील चिंचवली या छोट्याशा गावातील शमा बुटाला व लग्नानंतरच्या शमा कपिल केसकर यांनी हा पराक्रम करुन दाखविला आहे. शमा केसकर या सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. मात्र त्यांची नाळ आजही कोकणाशी जोडली गेली आहे. त्यांचे कुटुंब हे ठाणे अंबरनाथ येथे वास्तव्यास असून त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण हे मुंबई यूनिव्हर्सिटीतून पूर्ण केले. त्यानंतर तिने अमेरिकेत मास्टर्स इन कम्यूनिकेशन ही पदवी संपादन केली. अमेरिकेत तिने विविध टेक कंपनीत वरीष्ठ पदावर काम करुन नावलौकीक मिळवला व स्वतः ला सिद्ध केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्या सध्या अमेरिकेत स्टेल्थ एआय स्टार्टअप कंपनीत मुख्य टेक्नॉलॉजी ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत. शमा यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच "कोकण रत्न पदवी पुरस्कार" साठी अधिकृत घोषणा केली आहे. शमा कपिल केसकर यांना हा पुरस्कार शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे दिला जाणार आहे. हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिन कळझुनकर उपस्थित राहणार आहेत.

टाइम्स स्पेशल

तसेच या संस्थेचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि सल्लागार दिलीप लाड हेसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. शिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील या दरम्यान कोकण रत्न पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शमा केसरकर यांच्या कर्तृत्वाची दखल घेत, हा मानाचा किताब देवून सन्मानित केले जाणार आहे. त्यांच्या या यशाबाबत सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg