loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय.हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खेड शाळेत रौप्य महोत्सव वर्ष पूर्तीनिमित्त आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धां

खेड - अल्‌ मदिना वेलफेअर असोसिएशन द्वारा संचलित एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खेड शाळेच्या रौप्य महोत्सव वर्ष पूर्तीनिमित्त आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धा दि.२९/११ /२०२५ ते ३०/११ /२०२५ रोजी आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेसाठी खेड तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा १७ व १९ वर्षे या दोन वयोगटात घेण्यात आली. १७ वर्षे वयोगट विजयी संघ : १. छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल, जामगे -प्रथम क्रमांक. २. नवभारत हायस्कूल, भरणे - द्वितीय क्रमांक ३. एल. टी. टी.इंग्लिश मीडियम स्कूल, खेड - तृतीय क्रमांक. १९ वर्षे वयोगट विजयी संघ : १. न्यू स्कूल, आंबवली - प्रथम क्रमांक २. एम. आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल, खेड -द्वितीय क्रमांक ३. छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल, जामगे -तृतीय क्रमांक.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेसाठी शाळेचे क्रिडाविभाग प्रमुख भास्कर संदीप, क्रिडा शिक्षिका पिपुलकर तस्मिया, कांबळे समिधा या सर्वांचे अथक परिश्रम व शाळेच्या मुख्याध्यापिका तिसेकर सलवा यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा यशस्वीरित्‍या पार पडल्या. या सर्व यशस्वी संघांचे अल्-मदिना वेलफेअर असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष बशीरभाई हजवानी, उपाध्यक्ष निसार खतीब, स्कूल कमिटी चेअरमन सिकंदर जसनाईक, संस्था सचिव हनिफ घनसार, सहसचिव गुलाम मोहिद्दीन तांबे, खजिनदार आरीफ मुल्लाजी, सहखजिनदार निसार सुर्वे, संचालक मन्सूर मुकादम, शौकत मुजावर, दुर्वेश पालेकर, सिराज पटेल, वहाब बिजले, जिब्रान हजवानी, महामुद हजवानी, अखलाक हजवानी, हनिफ तांबे, इब्राहीम हजवानी, आदम हजवानी या सर्व पदाधिका-यांनी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सलवा तिसेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg