loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे वार्षिक पुरस्कार जाहीर; १४ डिसें.ला वितरण

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाने आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले आहेत. राणी लक्ष्मीबाई पुरस्कार वैष्णवी सुशील फुटक (रत्नागिरी), धन्वंतरी पुरस्कार डॉ. गजानन केशव केतकर (साखरपा), आदर्श पौरोहित्य पुरस्कार वेदमूर्ती अनिरुद्ध अनंत ठाकूर (नाटे) यांना जाहीर झाला आहे. आचार्य नारळकर पुरस्कार प्रज्ञेश प्रभाकर देवस्थळी (आडिवरे), आदर्श कीर्तनकार पुरस्कार हभप पुरुषोत्तम विष्णू काजरेकर (कुडाळ) यांना देण्यात येणार आहे. उद्योजक पुरस्कार प्रशांत गौतम आचार्य व हृषिकेश विनायक सरपोतदार (रत्नागिरी) आणि उद्योगिनी पुरस्कार सौ. कांचन समीर चांदोरकर (लांजा) व कृषीसंजीवन पुरस्कार अतुल अनंत पळसुलेदेसाई (व्हेळ, लांजा) यांना देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मानस देसाई यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुरस्कार वितरण सोहळा येत्या १४ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर उपस्थित राहणार आहेत. स्वास्थ्य : नवी पिढी-नवी आव्हाने या विषयावर डॉ. किंजवडेकर व्याख्यान देणार आहेत. या कार्यक्रमाला कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे सदस्य, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

प्रमुख पाहुणे डॉ. उपेंद्र शंकर किंजवडेकर हे १९९१ पासून कमलेश मदर अँड चाइल्ड हॉस्पिटल येथे कंसल्टिंग पेडिऍट्रिशियन म्हणून कार्यरत आहेत. इंडियन अकादमी ऑफ पेडिऍट्रिक्सचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय पेडिऍट्रिक असोसिएशनच्या कमिटीचे सदस्य, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे सदस्य म्हणून काम करत आहेत. त्यांची पुस्तके, शोधनिबंध प्रकाशित झालेत. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रासह विविध राज्यांत अनेक व्याख्याने दिली आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर अबूधाबीमध्ये समन्वयक, पॅनलिस्ट, सिंगापूर, शेंगेन येथे सत्र समन्वयक, युएईमध्ये व्याख्याते म्हणून भूमिका बजावल्या आहेत. त्यांचे व्याख्यान उद्बोधक ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg