loader
Breaking News
Breaking News
Foto

एकल महिलांच्या मुलांना दर महिन्याला २२५० रुपये बालसंगोपन शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी शिक्षकांना आवाहन

रत्नागिरी ( संतोष कांबळे) :- सद्या एकल महिलांच्या मुलांची माहिती जिल्ह्यातील शाळांमधून घेतली जात असून एकल महिलांच्या दोन मुलामुलींना प्रत्येकी २२५० रु शिष्यवृत्ती दर महिन्याला मिळवून देण्यासाठी शिक्षक, शाळा, पालकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन शिक्षण क्षेत्राचे गाढे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हेरंब कुलकर्णी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या साऊ एकल महिला समितीने महाराष्ट्रातील ७० तालुक्यात कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभारले आहे. हे सर्व कार्यकर्ते एकल महिलांच्या हक्कासाठी राज्यभरातील ७० तालुक्यात काम करत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेतंर्गत आई किंवा वडील गमावलेल्या तसेच पात्र बालकांना या योजनेचा लाभ मिळवता येते. ते पालक सर्वसाधारण कुटुंबांतील असावेत. अनाथ, निराश्रित,बेघर व आपत्तीत असलेल्या बालकांचे संस्था बाह्य व कौटुंबिक वातावरणात संगोपन होण्याच्या दृष्टीने या मुलांना संस्थेत दाखल करण्याऐवजी कौटुंबिक वातावरणात त्याचे संगोपन होऊन त्याचा विकास घडवून आणण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना ३० मे २०२३ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

शून्य ते १८ वयोगटातील बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळणार असून एका कुटुंबातील दोन किंवा जास्त ही बालकांची परिस्थिती पाहून लाभ दिला जाणार आहे. पण कोरोना कुटुंबासाठी मुलांची संख्या व उत्पन्न अट ठेवण्यात आलेली नाही .एकल महिलेच्या एका बालकासाठी प्रत्येक महिन्याला २२५० ₹ मिळणार आहेत.कोरोनामध्ये पालक गमावलेल्या लाभार्थी एका बालकास दरमहा ४ हजार ₹ मिळतात. योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड पालक व बालकांचे, शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र, तहसीलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र,मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, बॅंक पासबुक , मृत्यूचा अहवाल, रेशन कार्ड, घरासमोर पालक व बालकांचे अंगणवाडी सेविकेसमवेत काढलेले छायाचित्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. हा अर्ज मंजूरीचे अधिकार जिल्हा बाल कल्याण समितीला आहेत . त्यांनी लाभार्थी व पालकांसह सुनावणी घेतल्यानंतर अर्ज मंजुरीनंतर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालया मार्फत योजनेची अंमलबजावणी होते. तालुकास्तरावर अंगणवाडी ऑफिसमध्ये जाऊन बालसंरक्षण अधिकारी यांना संपर्क केल्यास अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका व एकात्मिक बालविकास कार्यालय ही माहिती देऊ शकतात. दरम्यान, शिक्षकांनी एकल महिलांच्या पुनर्वसनाच्या कामात सामील होण्याचे आवाहन साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे. त्यांनी एकल महिलांसाठी काम सुरू करायचे असल्यास 8208589195 या क्रमांकावर मेसेज करण्याचे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg