loader
Breaking News
Breaking News
Foto

जलजीवन मिशनअंतर्गतचे रखडलेले काम पूर्ण करून देण्याच्या लेखी आश्वासननंतर उपोषण मागे

साटेली (प्रतिनिधी) - जलजीवन मिशन अंतर्गत पिकूळे येथे नळपाणी योजना दुरुस्ती करणे या कामाचे मक्तेदार बिपीन कोरगावकर यांना सदर नळयोजना दुरुस्तीचे शिल्लक असलेले काम त्वरीत सुरु करुन पुर्ण करणेबाबत सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत.सदर कामाच्या जलवाहिनीचे काम करीत असताना विरोध होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने सहकार्य करावे.त्यानुसार सदरचे काम मक्तेदाराकडुन दिनांक १० डिसेंबर रोजी पासुन सुरु करुन दिनांक ३१ जानेवारी २०२६ पर्यंत काम पुर्ण करुन घेण्यात येईल. असे ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता निखील महादेव नागुर्डेकर यांच्या लेखी आश्वासन नंतर पिकुळे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी तूर्तास उपोषण मागे घेत. दिलेल्या तारखेला सुरु नं केल्यास ११ डिसेंबर पासून पुन्हा उपोषणास बसणार असल्याची डेड लाईन दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पिकुळे गावात जलजीवन मिशनअंतर्गत चे ठेकेदाराच्या निष्काळजी पणामुळे गेल्या वर्षभरापासुन काम रखडलेले आहे.ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पिकुळे गावात पाण्याची गंभीर समस्या उद्भवली असून ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी ठेकेदाराला रखडलेले काम सुरु करण्याबाबत वारंवार मागणी करून देखील ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने तिव्र नाराजी व्यक्त करत. दिनांक १ डिसेंबर पर्यंत कामाला सुरुवात करण्यात यावी अशी सरपंच, उपसरपंच सदस्य यांनी लेखी मागणी संबंधित अधिकारी यांच्या जवळ केली होती. मात्र संबंधित ठेकेदार यांनी काम सुरु न केल्याने रखडलेले काम तात्काळ सुरु करण्याच्या मागणी साठी आज मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ पंचायत समिती कार्यालयासमोर सरपंच आप्पा गवस, उपसरपंच निलेश गवस, सदस्य रत्नदीप गवस, रामा नाईक, शंकर गवस, सौ. निशा गवस यांनी बेमुदत उपोषण सुरु केले.

टाइम्स स्पेशल

दरम्यान उपोषण कर्ते सरपंच आपा गवस, उपसरपंच आणि सदस्य यांच्या समवेत गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांच्या दालनात बैठक झाली यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत गवस, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग कनिष्ठ अभियंता निखील महादेव नागुर्डेकर, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग कनिष्ठ अभियंता जय यादव गुंजाळ उपस्थित होते. लेखी पत्र देऊनही याची दखल घेतलेली नसल्याने उपोषणास बसण्याची वेळ आली. जर बुधवार पासून या कामाला सुरुवात करत असाल तर उपोषण मागे घेऊ अशी आक्रमक भूमिका घेत हे उपोषण मागे घेणार नाही असे सांगितले. यावर सर्वांच्या समविचाराने तोडगा काढत दिनांक १० डिसेंबर पासून कामाला सुरुवात केली जाईल व दिनांक ३१ जानेवारी २०२६ पर्यंत काम पूर्ण करून दिले जाईल असे ग्रामिण पाणी पुरवठा विभाग कनिष्ठ अभियंता निखील महादेव नागुर्डेकर यांनी सांगत तसे लेखी पत्र देवू. यावर उपोषण कर्ते यांनी सामंजस पणाची भूमिका घेत १० डिसेंबर पासून कामाला सुरुवात ण केल्यास दिनांक ११ डिसेंबर २०२५ पासून पुन्हा उपोषणास बसणार असल्याचे स्पष्ट भूमिका मांडळी. त्यानंतर ग्रामिण पाणी पुरवठा विभाग कनिष्ठ अभियंता निखील महादेव नागुर्डेकर यांनी तसे लेखी पत्र दिल्या नंतर आजचे उपोषण सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी तूर्तास मागे घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg