loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये १० प्रभागांमध्ये २० मतदान केंद्रे

खेड (दिलीप देवळेकर) - खेड नगर परिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले आहे. यावर्षी होणाऱ्या निवडणुकीसाठी १० प्रभागांत २० मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील एकूण १३,९९५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महादेव रोडगे यांनी दिली. गतवेळी झालेल्या निवडणुकीत १७ प्रभाग व १७ नगरसेवक असे समीकरण होते. मात्र यावर्षीच्या निवडणुकीत ३ नवीन सदस्यांची संख्या वाढली आहे. शहरात एकूण १० प्रभागांची निर्मिती करण्यात आली असून प्रत्येक प्रभागातून २ नगरसेवक निवडून येणार आहेत. प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वात जास्त मतदार असून त्यांची संख्या १९४६ एवढी आहे, तर सर्वात कमी मतदार प्रभाग क्रमांक ४ मध्ये असून केवळ १०५७ मतदार आपले दोन नगरसेवक निवडून देणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यादीत एकूण २० मतदान केंद्रांचा समावेश असून, त्यांची ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत प्रभाग १ : जिल्हा परिषदेची मराठी शाळा क्र. २, क्षेत्रपालनगर मतदान केंद्र १ दक्षिणेकडील खोली क्र. १, मतदान केंद्र २ पश्चिमेकडील खोली क्र. २, प्रभाग २: अल मदिना वेल फेअर असोसिएशन इंग्रजी शाळा खेड खेड नगर परिषद. (नवीन इमारत) मतदान. केंद्र १ पूर्वेकडील खोली क्र. १, मतदान केंद्र दक्षिणेकडील खोली क्र. २, प्रभाग क्रमांक ३ अल मदिना वेल फेअर असोसिएशन इंग्रजी शाळा मतदान केंद्र १ पश्चिमेकडील खोली क्र. १, मतदान केंद्र पश्चिमेकडील खोली क्र. २, प्रभाग क्रमांक ४- जिल्हा परिषद शाळा १, मतदान केंद्र १-पूर्वेकडील खोली क्रमांक २, मतदान क्रमांक २-पूर्वेकडील खोली क्रमांक ४, प्रभाग क्रमांक ५ : एल. पी. इंग्लिश स्कूल खेड मतदान क्रमांक १ पूर्वेकडील खोली क्र. १, मतदान केंद्र २- दक्षिणेकडील खोली क्र. २, प्रभाग क्रमांक ६- श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक १ पश्चिमेकडील खोली क्र. ४.

टाइम्स स्पेशल

मतदान केंद्र २ पश्चिमेकडील खोली क्र. ६, प्रभाग क्रमांक ७: जिल्हा परिषद केंद्रीय शाळा क्र. ३ मतदान केंद्र क्र. १ पश्चिमेकडील खोली १, मतदान केंद्र २ - पश्चिमेकडील खोली ५, प्रभाग ८ : एल.टी. टी. हायस्कूल मतदान केंद्र १ दक्षिणेकडील खोली क्र. ६, प्रभाग ९ः हाजी एस. एम. मुकादम हायस्कूल मतदान केंद्र १ पश्चिमेकडील खोली क्र. ५, मतदाना केंद्र २- पश्चिमेकडील खोली क्र. १०, प्रभाग १०: अंजुमन तालीम उर्दू शाळा, बंदररोड खेड मतदान केंद्र १ - पश्चिमेकडील खोली क्र. १, मतदान केंद्र २ उत्तरेकडील खोली क्र. २ मतदान केंद्रे आहेत. नगरपरिषद मुख्याधिकारी महादेव रोडे यांनी सांगितले की, सर्व मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली असून मतदारांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा सुनिश्चित केल्या जात आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी सर्व विभाग सज्ज आहेत. या निवडणुकीत मतदान केंद्रावर १०० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. त्यामध्ये मतदान केंद्र कर्मचारी ८०, पोलिस कर्मचारी २० असे एकूण १०० कर्मचारी असणार आहेत. शहरातील वीस मतदान केंद्रांना ३ झोनमध्ये विभागण्यात आले असून प्रत्येक झोनसाठी एक अधिकारी व एक सहाय्यक तैनात करण्यात आला आहे, तर तीन पथक राखीव ठेवण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून मतदान यंत्रे व पथके रवाना होतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg