loader
Breaking News
Breaking News
Foto

लवेल येथे बुधवारपासून खेड तालुका ५३ वे विज्ञान प्रदर्शन

खेड (वार्ताहर) - तालुक्यातील लवेल येथील पद्मश्री डॉ. के. एच. घरडा विज्ञाननगरी व घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती शिक्षण विभाग खेड व घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी लवेल आणि जिल्हा परिषद शाळा लवेल नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ३ ते शुक्रवार दि.५ डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या खेड तालुका ५३ व्या विज्ञान प्रदर्शनाचा उद्‌घाटन सोहळा राज्याचे गृह, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मा. ना. श्री. योगेशदादा कदम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उद्‌घाटक म्हणून गुहागर-खेड विधानसभा मतदार संचाचे आमदार भास्करशेठ जाधव, जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्रीमती वैदेही रानडे, खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, सहायक गटविकास अधिकारी विजय करपे, जि.प. शिक्षणाधिकारी किरण लोहार, मुंबई घरडा फाऊंडेशनचे विश्वस्त सतीश वेंगोली व निलेश कुलकर्णी हे उपस्थित राह‌णार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच अतिथी म्हणून लवेल नं.१ शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश कडव, लवेल सरपंच सौ. आदिती गमरे, खेड प्राथमिक शिक्षक संघटनेचे निमंत्रक राजेंद्र चांदिवडे व खेड तालुका माध्यमिक मुख्याधापक संघाने अध्यक्ष प्रशांत खेडेकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम पत्रिकेनुसार बुधवार दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० ते ५ - नाव नोंदणी व विज्ञान प्रदर्शन मांडणी, गुरुवार दि ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते १० - विज्ञान दिंडी, सकाळी ११ ते दुपारी १ - उद्‌घाटन समारंभ, दुपारी १ ते २-स्नेह‌भोजन, दुपारी २ ते ५ - परिक्षण व खुले विज्ञान प्रदर्शन, शुक्रवार दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते १२:३० - प्रश्नमंजुषा व परिक्षण, खुले विज्ञान प्रदर्शन, दुपारी १ ने २ - स्नेह‌भोजन व दुपारी २ ते ४ या वेळेत बक्षीस वितरण व समारोप समारंभाने विज्ञान प्रदर्शनाची सांगता होणार आहे.

टाइम्स स्पेशल

तरी या खेड तालुका ५३ व्या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन खेड गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, तसेच शिक्षण विस्तार अधिकारी लिना भागवत, संतोष भोसले श्रीधर शिगवण, तबस्सुम काझी, सुनील वरेकर, विद्या गुजर व नयना कासारे तसेच खेड तालुका विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा सुनीता बेलोसे, लवेल केंद्रप्रमुख विनायक नलावडे, केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष सुरेश आखडमल, लवेल नं.१ शाळेच्या मुख्याध्यापिका आरती भागणे, लवेल घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सर्व विभागप्रमुख खेड शिक्षण विभागातील सर्व केंद्रप्रमुख, खेड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांचे सर्व अध्यक्ष व पदाधिकारी, तालुका विज्ञान मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य आणि खेड शिक्षण विभागातील सर्व विषयतज्ज्ञ, विशेष शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी आदींनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg