loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

संगलट खेड (इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे दापोलीच्या राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे. गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्या कार्यशैलीने आणि नेतृत्वाने प्रभावित होऊन अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्याचे सांगितले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका युवक अध्यक्ष विजय मुंगशे, पिंट्या माने, आसूदचे उपसरपंच राकेश माने, आंजर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच मेघना मंगेश पवार, तसेच वैभव धामणे, शिल्पा माने, संजना केळस्कर, स्वप्निल कलमकर, आंजर्लेचे उपसरपंच प्रथमेश केळस्कर, सिद्धी संदीप पवार आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे दापोली तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचे मानले जात आहे. तसेच नामदार योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वावर वाढत चाललेला विश्वास आणि त्यांचा वाढता प्रभाव याचीही पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg